टेक्निकल अनालिसिसचा उपयोग करावा कि नाही ?

टेक्निकल अनालिसिस एक शस्त्र


आपण अगोदरच्या पोस्ट मध्ये पाहिलं कि कसे टेक्निकल अनालिसिस एका ट्रेडरला किंमती समजण्यास मदत करते. आणि कसे ते बाजारातील मागणी आणि आपूर्ति यांचा अभ्यास करते. एक अनुभवी ट्रेडर ह्या सर्व गोष्टींचा उपयोग बाजारात फायदा कमवण्यासाठी करू शकतो. आणि आपली जोखीम हि नियंत्रित ठेवण्यासाठी हि करू शकतो. एका ट्रेडर चे काम असते कि, शेअर्स च्या किंमतीचा चार्टवर ( वाचा : शेअर बाजारातील चार्टचे प्रकार ) अभ्यास करून त्याचा भविष्यातील ट्रेंड ठरवणे आणि ह्या माहितीच्या आधारे बाजारात खरीदी वा विक्री करून फायदा कमविणे.

टेक्निकल अनालीसीस हे एक ट्रेडिंग साठी एक उत्कृष्ट साधन आहे, जे प्रत्येक सेकंदात हजारो ट्रेडर्सना खरीदी आणि विक्री करण्याचे निर्णय घेण्यास मदत करत असते. हे फक्त ट्रेडर्स हि नाही तर निवेशकांना सुद्धा हाच प्रकारे मदत करीत असते.
अजूनही हि दुविधा कायम आहे कि, एका निवेशकाने टेक्निकल अनालीसिसचा निवेश करताना उपयोग करावा कि नाही. पण मी हे अनुभवावरून सिद्ध करू शकतो कि टेक्निकल अनालिसिस हे एका निवेशकची एका ट्रेडरप्रमाणेच मदत करते आणि त्याच्या यशात सहभागी होते. फरक फक्त होल्डिंग टाइम चा असतो.
कारण एक ट्रेडर चा होल्डिंग टाइम हा काही मिनिटापासून काही आठवड्यापर्यंत चा असतो तर निवेशक हा शेअर्स ची होल्डिंग काही महिन्यापासून ते काही वर्ष्यापर्यंत करतो. माझ्यामते ट्रेडर आणि निवेशकात जास्त काही फरक नाही. एक ट्रेडर हि निवेशाकाप्रमाणे शेअर जर अप ट्रेंड मध्ये असेल तरच खरीदी करतो. जर एक निवेशकाचे लक्ष्य अल्पावधीत पूर्ण झाले तर तो निवेशक ट्रेडर मध्ये बदलून जातो.
तसे ट्रेडिंग वा निवेशात आपण ट्रेडर आहात कि निवेशक हे महत्वाचे नसते तर आपण किती कमी जोखीम घेवून किती जास्त फायदा कमविता हा असतो.
 

ट्रेडर वा निवेशक दुविधा


सुरवातीच्या काळात अथवा बाजारात नवीन असताना ट्रेडर्स हे एका दुविधेत फसलेले आढळतात, कि मी एक ट्रेडर बनू कि एक निवेशक आणि काही वेळेस तर ते चुकीच्या कारणामुळे ट्रेडर पासून एक वाईट निवेशक बनतात. जेव्हा तुम्ही मार्केट मध्ये पाउल ठेवता, तेव्हा तुमचा उद्देश हा योग्य वा कमी जोखीम घेवून फायदा कसा कमवावा हा असतो. पण बरेच जण काळाच्या ओघात हे सर्व विसरून जातात आणि चुकीच्या गोष्टींवर स्वतचे लक्ष्य केंद्रित करतात.
टेक्निकल अनालिसिस चा उपयोग ट्रेडर एका घंट्याच्या ट्रेडसाठी हि करू शकतो तर एक निवेशक त्याचा उपयोग १० वर्ष्याच्या निवेशासाठी हि करू शकतो. टेक्निकल अनालिसिस एक ट्रेडर ला योग्य किंमत आणि मोके शोधण्यास मदत करते तर एका निवेशकाला एका चांगल्या शेअर्सच्या किंमतीचा तळ आणि शीर्ष शोधण्यास मदत करत असते. ज्यामुळे तो तळात खरीदी करून शीर्ष स्थानी चांगला मोठा फायदा कमवून बाहेर पडू शकतो. अजून टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने एक निवेशक शेअर्स थोड्या थोड्या प्रमाणात जमा करू शकतो आणि वर जाताना थोडा थोडा फायदा बुक करू शकतो. जर शेअर्स चा मुख्य ट्रेंड काही बातम्या वा मुलभूत कारणामुळे खराब होतो तर अश्या शेअर्स मधून टेक्निकल अनालिसिस ची मदत घेवून जास्त नुकसान होण्या अगोदर एक निवेशक बाहेर पडू शकतो. कारण त्याचा मुख्य ट्रेंड हा चांगला आहे कि खराब झाला हे फक्त टेक्निकल अनालिसिस द्वारेच कळू शकते.
त्यामुळेच परिस्थिती नुसार एक ट्रेडर वा एक निवेशक टेक्निकल अनालिसिस चा उपयोग एका शस्त्राप्रमाणे करून फायदा हातात ठेवणे आणि नुकसानी पासून वाचण्यासाठी सहज करू शकतो. त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिस वेगवेगळ्या शेअर्स आणि सेक्टर्सचे विश्लेषण करून त्यात किती मोके आहेत हे सुद्धा शोधू शकतो. त्यामुळे ट्रेडर्स आणि निवेशाकाला आपला पैसा हा योग्य ठिकाणी लावता येतो. ह्या सर्व गोष्टी ट्रेडर्स आणि निवेशाकाला बाजारात जिंकण्याची संधी प्रदान करतात. ह्या सर्व गोष्टी एक ट्रेडर ला आणि एका निवेशाकाला समान स्वरुपात लागू होतात.
शेवटी थोडक्यात एवढेच सांगेल कि आपण एक ट्रेडर असाल वा निवेशक यांनी काही फरक पडत नाही, कारण तुमचा बाजारात येण्याचा मुख्य उद्देश आहे फायदा कमविणे आणि बाजाराला पछाडने हा आहे. त्यामुळे उगाच ट्रेडर कि निवेशक ह्यात वेळ न घालता टेक्निकल अनालिसिस आणि त्याच्या शाखांचा ट्रेडिंग आणि निवेशात योग्य उपयोग करा आणि फायदा मिळवा.

COPYRIGHT © 2017. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy