टेक्निकल अनालिसिसचा जादुई डब्बा

टेक्निकल अनालिसिस चा प्रारंभिक परिचय

शेअर बाजारात टेक्निकल अनालिसिसचा उपयोग किमती ओळखण्यासाठी व त्याची भविष्यवाणी करण्यासाठी करतात. ह्यामुळे ट्रेडर्स व निवेशक ह्यांना किमतीवरून खरेदी व विक्री चे निर्णय करण्याची मदत होते. टेक्निकल अनालिसिस मध्ये फक्त चार्ट वाचणे , इंडिकेटर्सचे विश्लेषण करणे , चार्ट पैटर्न्स चे परिक्षण करने इतकेच नसून ट्रेडिंग वा निवेश करताना जोखिम संभाळने व या सर्व टूल च्या आधारे फायदा कसा कमवावा हे सुद्धा शिकवले जाते. टेक्निकल अनालिसिस चा प्रारंभिक परिचय जर आपल्याला मार्केट मधून फायदा कमवयाचा असेल तर आपल्याला टेक्नीकल एनालिसिस पद्धतिचा उपयोग योजना आखून व योग्य जोखिम स्वीकारुन करावा लागतो. ह्याच पद्धितिने आपण एक यशस्वी ट्रेडर बनू शकाल. मार्केट मध्ये शेवटी आपण किती फायदा कमवता हेच महत्वाचे असते न की किती हुशार व किती तज्ञं आहात. मार्केट मध्ये अपनास अशी खुप व्यक्तिमत्वे भेटतील जी खुप तज्ञं आहेत पण त्याना कधीच फायद्याची ओळख झालेली नसते. आपल्याला किती चांगल्या प्रकारे चार्ट वाचता येतो, इंडीकेटर्स वापरता येतात हे महत्वाचे नसून त्या माहितीच्या आधारे आपण किती फायदा कमावता हे महत्वाचे असते. ट्रेडिंग हा व्यापार मुख्यतः फायदा आणि तोटा सम्बंधित आहे, आणि त्यासाठी टेक्नीकल एनालिसिस खुप चांगल्या प्रकारे मदत करते. टेक्निकल एनालिसिस आणि फायदा कमवाने ह्या दोन गोष्टी वेग वेगळ्या आहेत पण एक दूसरयाशिवाय शक्य नाहीत.   अधिक माहितीसाठी वाचा : शेअर बाजारांचा इतिहास  

टेक्नीकल ट्रेडर

टेक्निकल ट्रेडर्स बाजारात किंमतीना पाहतो, त्याचे मापन करतो आणि त्याची भविष्यातील दिशा ठरवतो. किंमती ची दशा आणि दिशा ही बाजाराच्या जनतेच्या मनोदाशेचा परिणाम असतो. हेच शोधण्याचे साधन म्हणजे टेक्नीकल एनालिसिस होय. टेक्नीकल ट्रेडर व्यावारिक व फायदेशीर ट्रेडिंग मध्ये समयसूचकता असने खुप महत्वाचे असते, त्यामुळेच टी इतकी कठिन असते आणि बोटावर मोजण्या इतक्याच लोंकाना अवगत होते. छोट्या अवधिच्या ट्रेडिंग मध्ये आपण कीती उत्तम प्रकारे ट्रेडमध्ये प्रवेशित होता आणि किती लवकर आणि योग्य पद्धतीने बाहेर पड़ता ह्यावर किती फायदा होणार हे निर्भर असते. ट्रेडिंग हा समयसूचकता, योग्य विश्लेषण आणि अनुभव यावर मुख्यतः आधारित व्यवसाय आहे. जर आपण ह्या तिन्ही कला अवगत केल्या तर आपणास यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.   अधिक माहितीसाठी वाचा : शेअर बाजारातील चार्ट आणि त्यांचे प्रकार  

टेक्नीकल एनालिसिस आणि ज्ञान

आजच्या काळात टेक्नीकल एनालिसिस एका ट्रेडरच्या दैनदिन जीवनाचा अनिवार्य भाग झाला आहे. हा ट्रेडर्स च्या ट्रेडिंग संबंधी निर्णयात कोणत्या ना कोणत्या प्रकारे शामिल असतो आणि बाजारात फायदा कमवायचा संभाव्यता वाढवतो. कारण बाजारात विविध व्यापारी एकाच वेळेस किंमतीचे अनुमान बांधत असतात आणि सामान्यतः मुलभुत निर्देशकाचा उपयोग करत असतात ज्यामुळे किंमतीना दिशा आणि गति मिळण्यास मदत होते.जर शेअर बाजारात आपल्याला एक सफल व्यापारी बनायचे असेल तर ट्रेडिंग करताना स्वतंत्र विचार, कृतीची जबाबदारी आणि ज्ञानचा अवलंबन ना कि मनाचे. एक यशस्वी ट्रेडर नेहमी नुकसानातून लवकर बाहेर पडतो , फायदा लक्ष्य पर्यंत पकडून ठेवतो. याउलट नवीन ट्रेडर विरुद्ध वागून नुकसान वाढवत राहतात आणि जीवनात अशा ठिकाणी येवून थांबतात जेथे त्यांना कधीच यायचे नव्हते.   टेक्नीकल एनालिसिस आणि बुद्धिमत्ता   योग्य टेक्निकल अनालिसिस पद्धती मार्केटला हरवायला मदत करतात ज्याकी एका ट्रेडर साठी आनंददायी आणि बक्षीसासमान असतात. ह्यामुळे एका ट्रेडरचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला विजेता बनण्यासाठी प्रोत्सान देत राहतो. मार्केट आपण कोण आहात, काय करता वा कोठून आलेला आहात हे बघत नाही तर फक्त हे बघतो कि किती चांगले ट्रेडर आहात. मार्केट मध्ये प्रत्येक चुकीची लगेच किंमत चुकवावी लागते तर योग्य ट्रेड चा इनाम सुद्धा लगेच भेटतो. जर आपणास हार मानलेल्या व्यापारांच्या पंक्तीत बसायचे नसेल तर आज पासून टेक्निकल अनालिसिस पद्धतीचा आणि जोखीम व्यवस्थापनाचा अवलंब करा आणि आपल्या ट्रेडिंग जीवनाला सुखी आणि समाधानी बनवा.

COPYRIGHT © 2017. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy