टेक्निकल अनालिसिस कधी कधी काम करते आणि कधी नाही ?

टेक्निकल अनालिसिस नेमके काय आहे?

टेक्निकल अनालीसीस मध्ये मुख्यत चार्टसवर किंमतीचा अभ्यास केला जातो. किंमती ह्या बाजाराची मनोदशा आणि भावनाचे प्रतिबिंब स्वरूप असते. ह्याच कारणामुळे टेक्निकल अनालिसिस खूप वेळेस काम करते कारण सामान्य लोक एक समान परीस्थित एक समान निर्णय घेतात आणि एक समान चुका करतात. ज्यामुळे चार्ट वर सारखे “प्राईस पॅटर्नस” अथवा ज्याला “टेक्निकल पॅटर्नस” हि संबोधले जाते ते परत परत बनतात.

किंमतीची दिशा आणि दशा हि चार्ट ( वाचा : चार्ट चे प्रकार ) वर “मुविंग एवेरेजेस” आणि “इंडीकेटर्स” यांच्या मदतीने सहज शोधता येतात. आणि त्यांची वरील आणि खालील सीमा ह्या चार्ट वर सपोर्ट आणि रेसिस्तंस लाईन कडून निश्तित करता येतात. हा एक सरळ आणि सोपी पद्धत आहे जिचा उपयोग रोजच्या ट्रेडिंग मध्ये नियमित होत असतो. पण हे सर्व वापरण्यासाठी अनुभवाची नितांत गरज असते.
जेव्हा किंमती ( वाचा: बाजारात किंमतीचे महत्व ) रेसिस्तंस लाईनच्या वर ट्रेड करायला लागतात तेव्हा त्याला “ बुलीश ब्रेकाऊट” म्हणतात. त्याचप्रमाणे जेव्हा किंमती सपोर्ट लाईन च्या खाली उतरतात, तेव्हा त्याला “बिअरीश ब्रेकडाऊन” संबोधले जाते. ब्रेकआउट व ब्रेकडाऊन ह्या दोन्ही घटना एका ट्रेडर साठी खूप महत्वाच्या असतात. कारण ती वेळ, बुलीश ब्रेकाऊट झाल्यास खरीदी करण्याची तर बिअरीश ब्रेकडाऊन झाल्यास विक्री करण्याची असते. ब्रेकाऊट घटना किंमती सोबत इंडीकेटर्स मध्ये सुद्धा बघावयास मिळते. खूप वेळेस ब्रेकआउट व ब्रेकडाउन हे मुख्य ट्रेंड बदलण्याच्या वेळेस होतात आणि त्यामुळे ट्रेडर्सना एक फायद्याची लांब रॅली मिळते.
 

कधी कधी टेक्निकल अनालिसिस का काम नाही करत?

टेक्निकल अनालिसिस ( वाचा : टेक्निकल अनालिसिस चा जादुई डब्बा ) काही ट्रेडर्स साठी योग्य काम करत नाही आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे अनुभवाची कमी. जे ट्रेडर्स बाजारात नवीन आहेत आणि अनुभवहीन आहेत ती जास्त तर वेळेस किंमती, ट्रेंड आणि इंडीकेटर्स ची रचना समजून घेण्यात गफलत करतात आणि नुकसान करून बसतात. त्यामुळेच बाजारात म्हण आहे कि “ यशस्वी ट्रेडर मागे त्याची मेहनत आणि अनुभवाचा हात असतो”. खुपदा सामान्य आणि व्यावसाईक ट्रेडर एकाच प्रकारचा चार्ट वापरतात, एकच पद्धत वापरतात पण व्यावसाईक ट्रेडर फायदा कमवितो तर सामन्य ट्रेडर ला खुपदा नुकसानच होते. ह्याचे कारण एकमेव असू ते म्हणजे अनुभव.
दुसरे कारण म्हणजे काही वेळेस ट्रेडर्स हे चार्ट, प्राईस पॅटर्नस आणि इंडीकेटर्स मध्ये इतके गुंफून जातात कि मार्केट आणि त्यासभोवातालच्या परिस्थिती यांचा त्यांना विसर पडत चालतो. आणि ह्या कोषातून बाहेर ण आल्यामुळे हि खूप ट्रेडर्स ना तोटा सहन करावा लागतो.
हेच व्यावसाईक ट्रेडर्स मार्केट अनुसार , उतार चढाव अनुसार आपल्या टेक्निक आणि इंडीकेटर्स मध्ये बदल आणि त्रीक्ष्ण बनवत असतात. जसे कि जास्त चढ आणि उतार असलेल्या मार्केट मध्ये चार्ट वर जास्त वेळेस फाल्स ब्रेकआउट वा ब्रेकडाउन होतात पण त्यावेळेस व्यावसाईक ट्रेडर्स हे मुख्य ट्रेंड सोबत ट्रेडिंग चालू ठेवतात. दुसरे उदाहरण म्हणजे “बुल मार्केट” मध्ये किंमती “ओवरबॉट” परीस्थितीत महिने न महिने ट्रेंड करीत राहतात आणि मधे मध्ये चुकीचे “सेल” सिग्नल निर्माण करतात जे कि नवीन ट्रेडर्सच्या लक्षात येत नाही.
कधी कधी काही तकनीक काही काळापर्यंत सतत फायद्याच्या ठरतात, याचे कारण म्हणजे मुख्य मार्केट मेकर ह्याच टेक्निक वापरत असल्यामुळे. त्यामुळे नवीन ट्रेडर्स चा त्यावर कायमचा विश्वास बसून जातो. ह्याला “सेल्फ फुल फिलिंग प्रोफेसी” असेही म्हणतात.
काही ट्रेडर्स एकदम सामान्य गोष्टी वापरून फायदा कमवीत राहतात तर काही जटील आणि महाग ट्रेडिंग सिस्टीम वापरून सुद्धा नुकसान करीत राहतात. हे का होते कारण व्यावसाईक ट्रेडर्स गैर प्रचलित आणि अनुभवावर आधारित ट्रेडिंग सिस्टीम वर काम करतात ज्याची मार्केट वर पूर्णतः पकड असते. कारण मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याचा उद्देश हा फायदा कमविणे हा असतो न कि वैज्ञानिक दृष्ट्या योग्य असणे.
 

टेक्निकल अनालिसिसची पडताळणी

टेक्निकल अनालिसिस ( वाचा : टेक्निकल अनालिसिस चा उपयोग करावा कि नाही ) हे किंमतीचे पूर्वानुमान लावण्याचे तंत्र शुद्ध शास्त्र आहे. जे कि प्रत्येक वेळेस १००% काम करीत नाही , पण याचा अर्थ असा होत नाही कि के ते भरवसा करण्याच्या लायक नाही आहे. जगात जितके पण पूर्वानुमान लावण्याचे शास्त्र आहेत त्या सर्वात काही ण काही कमी जरूर असतात पण याचा अर्थ असाही होत नाही कि ती सर्व बेकार आहेत. जसे कि हवामान खाते.
स्टॉक मार्केट मध्ये कोणत्याही विश्लेशानात्म्क पद्धतीचे मूल्य त्याच्या फायदा कमविण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जर ती पद्धत भरपूर वेळेस फायदा कमवून देत असेल आणि ती वैज्ञानिक दृष्ट्या चुकीची असेल तरीही तीच पद्धत वापरली जाते आणि ट्रेडर्स मध्ये लोकप्रिय सुद्धा होते. कारण परत एकदा सांगतो “ बाजारात फायदा कमविणे हाच एक उद्देश असतो न कि वैज्ञानिक दृष्ट्या ट्रेडिंग करणे”.

COPYRIGHT © 2017. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy