टेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंगची यात्रा

बाजारात किंमती आणि त्यांची दिशा हि महत्वपूर्ण गोष्टी असतात. एका ट्रेडर चे काम आहे कि किंमतीचा अभ्यास करून त्याची योग्य दिशा ओळखून त्या दिशेने ट्रेड करून फायदा कमवणे. आणि त्यासाठी एका ट्रेडरला टेक्निकल अनालिसिस चे ज्ञान असणे खूप महत्वाचे असते.

trends%2Bon%2Bcharts टेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंगची यात्रा

चार्ट आणि किंमतीचा कल

जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस (वाचा : टेक्निकल अनालिसिसचा जादुई डब्बा ) शिकलेले असाल तर आपल्याला माहित आहे कि आपण इतर ट्रेडर पेक्षा सहज रीतीने चार्ट वर किंमतीचा कल शोधू शकता. जर आपण बाजारात नवीन असाल तर आपणास प्रथम चार्ट विषयी माहिती घ्याला हवी. चार्ट चे किंमतीच्या रेखाटणीनुसार विविध प्रकार आहेत. उदारणार्थ कॅण्डल स्टिक चार्ट, बार चार्ट आणि लाईन चार्ट , हे मुख्य आणि रोजनिशी उपयोगात येणारे चार्ट चे प्रकार आहेत. व्यावसाईक ट्रेडर्स कॅण्डलस्टिक चार्ट चा जास्त आणि सामान्यत उपयोग करतात. या चार्ट प्रकारात फायेदेशीर चार्ट आकृतिबंध निर्माण होतात जे ट्रेडर साठी खूप फायदाचे ठरतात.
बार चार्ट हा हि प्रकार कॅण्डलस्टिक चार्ट प्रकाराप्रमाणेच आहे पण हा खूप जुना आणि बोटावर मोजण्या इतकेच ट्रेडर्सच त्याचा उपयोग करतात. लाईन चार्ट हा चार्ट चा प्रकार सर्वात सोपा आणि सरळ आहे आणि तुम्ही हा चार्ट बहुतेक वेळा शेअर बाजाराच्या बातम्यात आणि एक्स्चेंजच्या वेब साईट वर पाहिलेला असेल.
 Technical%2Btrading%2Bjob टेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंगची यात्रा

टेक्निकल ट्रेडिंग कसे काम करते

टेक्निकल ट्रेडिंग मध्ये मुख्य उद्देश हा ट्रेंड ओळखणे ( वाचा : ट्रेंडला बनवा बाजारातील चांगला मित्र ) , ट्रेंडच्या दिशेने ट्रेड करणे आणि ह्या माहिती आधारे बाजारत फायदा कमवणे हा असतो. खालच्या ट्रेंड मध्ये ट्रेडर ला तळ निर्माण होण्याची वाट पहावी लागते आणि तो तयार झाल्याबरोबर खरीदी करावी लागते. ट्रेंड बदलने हि एक महत्वपूर्ण घटना असते आणि एका बुद्धिवान ट्रेडरसाठी फायदाकमावण्याची संधी, आणि ट्रेडरने ती कधीच चुकवू नये. ह्याच कौशल्यावर त्याला भविष्यात किती फायदा वा तोटा होणार आहे हे निर्भर असते.
हे सर्व ऐकण्यासाठी खूप सोपे वाटते पण प्रत्यक्षात ठेवढेच अवघड असते. म्हणूनच एक हुशार आणि खोल अनुभवी ट्रेडरच यशस्वी होतात आणि इतर अननुभवी ट्रेडर बाजारात असफल राहतात. त्यासाठीच जर आपणास एक सफल व्यावसाईक ट्रेडर बनायचे असेल तर बाजाराचे खोल ज्ञान घेवून ट्रेडिंग जीवनाची सुरुवात पेपर ट्रेडिंग व छोट छोट्या निवेशाने करावी हे तुम्हाला जास्त अनुभव देईल आणि अनुभव येईपर्यंत बाजारात जिवंत ठेवेल.
 Technical%2Btrading%2Bsummary टेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंगची यात्रा

टेक्निकल ट्रेडिंग चा सारांश

चार्ट हे एका ट्रेडरच खेळाडूप्रमाणे मैदान आहे. ह्याच मैदाना वर खेळून काही बुद्धीजीवी ट्रेडर्स आणि गणितज्ञ यांनी मिळून नव नवीन चार्ट प्रकार, इंडिकेटर्स, ओसिलेटर्स इत्यादी शोधून काढलेले आहेत जी रोजच्या दैनदिन जीवनात वापरली जातात आणि पारखलेली आहेत. हे सर्व गोष्टी बाजाराचे गणित चित्र स्वरुपात एका ट्रेडर समोर मांडतात. जे कि एक सामान्य माणसाला समजण्यास गणिता पेक्षा खूप सोपे असते.
जुन्या काळात ( वाचा : शेअर बाजाराचा इतिहास ) ट्रेडर्स हे चार्ट स्वतः च्या हाताने बनवत आणि उपयोगात आणत जे कि खूप मेहनतीचे, कंटाळवाणे, वेळखाऊ आणि थकवणारे काम होते. पण आते या तंत्रज्ञानाच्या युगात हे एका चुटकीसरशी कॉमपुटरच्या आणि इंटरनेटच्या मदतीने हे सर्व मिनिटात सहज शक्य आहे.
हाच कारणासाठी एका ट्रेडरकडे एक चांगला व्यक्तिगत काम्पुटर आणि एक चांगले इंटरनेट कनेक्शन असावे. हे सुरवातीच्या शिक्षणाचे पाटी आणि पुस्तक आहे. सामान्य ट्रेडर साठी वेबवर खूप सारे फुकटचे चार्टिंग सोफ्टवेअर्स उपलब्ध आहेत जे कि ते सुरवातीच्या मुलभूत ट्रेडिंग च्या शिक्षणासाठी सहज वापरू शकतात. जर सुरवातीच्या काळात ह्या सर्व गोष्टीवर जर अननुभवी ट्रेडर्स ने मेहनत घेतली तर त्याला भविष्यात एक यशस्वी व्यावसायिक ट्रेडर होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

COPYRIGHT © 2017. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services.