ट्रेंड आणि सामायावधी

ट्रेंड हि एक विविधता ने प्रेरित संकल्पना आहे आणि जी ट्रेडर्सच्या वापरानुसार आणि जरुरातीनुसार बदलली जाऊ शकते. ट्रेंड जी सोपी व्याख्या म्हणजे “ चार्ट वरील किंमतींची दिशा जी इंडीकेटर्सच्या मदतीने सहज ओळखली जाऊ शकते”. प्रत्येक ट्रेडर आपल्या जोखीम, समज आणि गरजेप्रमाणे ह्यात बदल आणि त्याचा उपयोग करू शकतो. जेव्हा किंमती इंडीकेटर्सनुसार योग्य दिशेने मार्गक्रमण करतात तेव्हा त्यांना “ट्रेंडीग प्राईसेस” म्हणतात.

ट्रेंडची विशेषतः

प्रत्येक शेअर वा कमोडिटीची ( वाचा : शेअर आणि कमोडीटी बाजाराचा इतिहास ) स्वतःची एक विशेष ट्रेंडीग क्षमता असते. त्यामुळेच एका सेक्टर मधील सर्व वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेंड आणि ट्रेड होतात. काही स्टॉक दुसऱ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ट्रेंड होतात आणि हे स्टॉक डे ट्रेडर्स चे आवडीचे स्टॉक बनतात. तर काही स्टॉक इतके ढिले असतात कि त्यामध्ये टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने न तर ट्रेड केले जाऊ शकते आणि ना निवेश केला जाऊ शकतो. स्टॉकच्या किंमतीतील उतार आणि चढाव आणि बाजाराचा कल ह्याही गोष्टी त्यासाठी प्रात्यक्षिक कारण ठरतात.
काही स्टॉक हे खूप काळापर्यंत ट्रेंड होतात तर काहीं मध्ये ट्रेंड ( वाचा : बनवा ट्रेंड ला फ्रेंड ) हे फटाफट बदलत राहतात, आणि असे स्टॉक एक ट्रेडर साठी खूप महत्वाचे असतात कारण त्यांच्या मध्ये रोज काही न काही ट्रेडिंग च्या संधी निर्माण होत राहतात. ह्या सर्व गोष्टी एक ट्रेडर चार्टवर सहज पाहू शकतो, ओळखू शकतो आणि त्याचा ट्रेडिंग साठी उपयोग सुद्धा करू शकतो. त्यासाठीच एका ट्रेडरने वा निवेशकाने ट्रेड अथवा निवेश करण्यापूर्वी स्टॉकचा चार्ट बघणे अनिवार्य असते, नाही तर विरुद्ध ट्रेंडमध्ये फसून त्यांना मोठे नुकसान झेलावे लागते. अननुभवी आणि नवीन ट्रेडर आणि निवेशक हा नियम सहसा पाळत नाही आणि नुकसान करून बसतात.
जर आपण एक चार्ट ( वाचा : चार्ट प्रकार ) दहा वेगवेगळ्या ट्रेडरना दाखवला तर आपल्याला दहा वेगवेगळी उत्तरे मिळतील कारण प्रत्येकचा आपले स्वतंत्र ज्ञान असते, वेगळी जोखीम असते आणि वेगळा अनुभव असतो. त्याचमुळे आपण बघता कि विविध बाजार सल्लागार एका स्टॉक विषयी वेगवेगळी मते मांडतात आणि वेगवेगळे सल्ले देतात.
माझ्या मागील ८ ते १० वर्षाच्या अनुभवावरून मी अनुभवले आहे कि, कमोडीटी आणि करन्सी वैश्विक कारणामुळे जास्त वेळेस योग्य ट्रेंडचे अनुसरण करतात, तर स्टॉक हे लोकल इकोनोमीसी निगडीत असल्यामुळे ते तुलनात्मक दृष्ट्या कमी वेळेस ट्रेंडचे पालन करतात.
कारण कमोडिटी आणि करन्सी हे अर्थव्यवस्थेसी सरळ जुडलेले असतात तर स्टॉक हे त्या मानाने कमी संबंधीत असतात. एक अनुभवी आणि व्यावसाईक ट्रेडर प्रत्येक वेळेस स्टॉक वा कमोडीटीसोबत विश्लेषणासाठी योग्य वेळ घालवतो आणि बघतो कि किती वेळेस ते ट्रेंड होतात आणि किती वेळेस नाही. ह्यामुळे त्या स्टॉक किंवा कमोडिटीच्या ट्रेंड आणि ट्रेडिंग ची आईडिया समजून जाते. ( वाचा : ट्रेडिंग यात्रा )

ट्रेंडची ओळख

कोणताही स्टॉक वा कमोडिटी हि प्रत्येक वेळेस ट्रेंडमध्ये असेलच असे नाही. चांगल्यात ला चांगला स्टॉक वा कमोडिटी काही वेळ साइड वेज़ ट्रेंड ( रेंग बाउंड ट्रेड ) मध्ये व्यतीत करतो. साइड वेज़ ट्रेंडलाच कंसोलिडेशन हि म्हणतात. कंसोलिडेशन मध्ये किंमती एका सीमेत फिरत राहतात. हि वेळ सुद्धा एका ट्रेडर साठी खूप महत्वाची असते कारण यात दोन्ही बाजूला ट्रेडिंग करता येते आणि जोखीम हि खूप कमी असते कारण यात ट्रेडरला किंमतीचा पल्ला माहित झालेला असतो. नवीन ट्रेडर साठी हि वेळ त्रादिंग करण्याची नसते कारण त्याच्या कमी अनुभवामुळे तो यात नुकसान करू शकतो. नवीन ट्रेडरनी वरचा किंवा खालचा ट्रेंड सुरु झाल्यावर ट्रेड घ्यावी. अनुभवी निवेशक साइड वेज़ ट्रेंडचा उपयोग स्टॉकचा संचय करण्यासाठी सुद्धा करतात.
आपण चार्ट च्या वेळेनुसार त्याचा उपयोग इंट्रा डे , छोट्या अवधीची ट्रेडिंग, मध्यम अवधीची ट्रेडिंग आणि निवेश ह्या वेगवेगळ्या प्रकारासाठी करू शकतात. उदाहरणार्थ, दिवसीय चार्ट वर जर कंसोलिडेशन फेज दिसत असेल तर साप्ताहिक वा मासिक चार्ट वर हे कंसोलिडेशन वरच्या वा खालच्या ट्रेंड चा भाग आहे हे ट्रेडर सुनिश्चित करू शकतो आणि त्याप्रमाणे नवीन ट्रेड घेवू शकतो. जेव्हा किंमती ( वाचा : बाजारातील किंमतीचे महत्व ) , सरासरीपेक्षा वरती ट्रेड करतात तेव्हा त्यांना वाढता ट्रेंड म्हणतात, आणि जर किंमती सरासरीपेक्षा खाली पडल्या तर त्याला बिअरीश ब्रेकडाऊन म्हणतात.

ट्रेंड आणि समयसीमा

चार्ट वर जर चार्ट ची समय सीमा बदलली तर ट्रेंड चा पारिपेक्ष सुद्धा बदलतो. उदारणार्थ, दिवसीय चार्ट वर अप ट्रेंड असेल तरीही तो स्टॉक मासिक चार्ट वर खालच्या ट्रेंड मध्ये असू शकतो. आणि त्यामुळे त्याचा उपयोगसुद्धा बदलतो. जसे कि जर निवेशकाने दिवसीय चार्ट बघून निवेश केला तर तो त्या निवेशात अडकेल आणि दूरगामी नुकसानात राहील.
वरील उदाहरणात मासिक चार्ट हा मुख्य ट्रेंड असून त्याचा प्रभाव हा साप्ताहिक आणि दिवसीय चार्ट वर पण दिसून येतो. त्यामुळेच बारकाई पाहणारा ट्रेडर हे सर्व जाणून असतो आणि योग्य प्रकारे ट्रेड मध्ये प्रवेश आणि निर्गम घेतो. ट्रेडर नि कधीही चार्ट च्या समय सिमेनुसार ट्रेड आणि जोखीम घ्यावी. जसे कि दिवसीय चार्ट बघून छोट्या अवधीची ट्रेड करावी तर साप्ताहिक आणि मासिक चार्ट बघून मध्यम व दीर्घ अवधीचा निवेश करावा. उलट केल्यास नुकसान होण्याची शकता सर्वात जास्त असते.
त्यामुळेच जर ट्रेंड ची सामायावधी माहित नसेल तर तो ट्रेंड ट्रेडरच्या काही कामाचा नाही.
जर आपण असे करता तर ते टेक्निकल ( वाचा : टेक्निकल अनालिसिसचा जादुई डब्बा ) दृष्ट्या पूर्णतः चुकीचे होईल. हीच सर्व बाजारातील अवघड आणि जटील बाबी आहेत आणि सामान्य ट्रेडरला हे सर्व माहित नसते आणि माहित असेल तर हे सर्व नवीन असते. तर जेव्हा पुढच्या वेळेस ट्रेड कराल तर तेव्हा ट्रेंड समजून घ्या आणि त्यासोबत त्याची सामायावधी सुद्धा जाणून घ्या.

COPYRIGHT © 2017. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy