ट्रेडिंगमध्ये उपयोगात येणारे चार्टचे विविध प्रकार

नमस्कार मित्रानो, ह्या पोस्टमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चार्टिंग स्टाइल अथवा प्रकारांची माहिती घेवुन त्याचा उपयोग दैनदिन ट्रेडिंग मध्ये कसा उपयोग करावा हे बघणार आहोत. हे चार्टचे प्रकार व्यावसायिक ट्रेडर आणि इन्वेस्टर्स रोज उपयोगात आणत असतात.

टेक्निकल एनालिसिसमध्ये चार्टचे मुख्यतः उपयोगात येणारे चार प्रकार आहेत. जे अधिकतर ट्रेडर्स आणि इन्वेस्टर्स मार्केटचा अभ्यास आणि मार्केट ट्रैक करण्यासाठी वापरतात. आणि ते आहेत : लाइन चार्ट, बार चार्ट, कैंडलस्टिक चार्ट, पॉइंट आणि फिगर चार्ट. आणि दुर्मळ आणि कधी कधीच उपयोगात येणारे चार्ट प्रकार म्हणजे :  वॉल्यूम कैंडल चार्ट, बेसलाइन डेल्टा चार्ट, स्केटरप्लाट चार्ट, कलर्ड स्टेप चार्ट, हैकिनआशी चार्ट, कागी चार्ट, थ्री लाइन ब्रेक चार्ट, रेंज बार चार्ट और रेनको चार्ट, इत्यादी.

 

आता आपण पुढे ह्या सर्व चार्टच्या प्रकारांचा विस्ताराने माहिती पाहून अभ्यास करणार आहोत आणि त्याचा प्रैक्टिकल ट्रेडिंगमधील उपयोग शिकणार आहोत.

लाइन चार्ट:  लाइन चार्टच्या प्रकारात चार्टवर डेटा अथवा कीमती बिंदुना रेषेने जोडून दाखविले जाते. ह्या बिंदुना मार्कर’स म्हणतात. लाइन चार्टचा उपयोग डेटा किमतीनुसार कसा बदलतो आहे हे दाखवन्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. हा चार्ट चा प्रकार सर्वात बेसिक चार प्रकार असून ह्याचा उपयोग विविध क्षेत्रात पण सतत होत असतो. हा चार्ट प्रकार, स्कैटर प्लाट चार्ट प्रकाराप्रमानेच असून फ़क्त हयात बिंदुना रेषेने जोडलेले असते तर स्कैटर प्लाट चार्ट मध्ये नुसते बिन्दुच असतात. स्टॉक मार्केट मध्ये लाइन चार्ट रोजच्या क्लोजिंग प्राइस जोडून दाखविण्यासाठी करतात. हे चार्ट कीमतीचा ट्रेंड स्पष्ट दर्शवितात पण किंमतीची वोलाटिलिटी मात्र लपवीतात. ह्याच कारणाने हा चार्ट प्रकार टेक्नीकल ट्रेडिंग मध्ये खुप कमी वेळा वापरला जातो. काही लॉन्ग टर्म इन्वेस्टर्स ह्या चार्ट च उपयोग इंडीकेटर्स आणि ओस्सीलेटर्स सोबत करून मार्केटचा टॉप एंड बॉटम शोधुन इन्वेस्टमेंट करण्यासाठी करतात.

बार चार्ट : बार चार्ट मध्ये एक सरल रेषा असते ज्यात वरचे टोक म्हणजे हाई तर खालचे टोक म्हणजे लो असतो. ह्या रेषेच्या उजव्या बाजूला क्लोजिंग प्राइस एका छोट्या रेषेने दर्शविलेली असते तर डाव्या बाजूला ओपनिंग प्राइस एका छोट्या रेषेने दाखवलेली असते. हा चार्ट कैंडलस्टिक चार्ट प्रमाणेच काम करतो आणि ट्रेडर्स ह्याचा उपयोग सामान्य चार्टिंग आणि चार्ट पैटर्न शोधण्यासाठी करतात. ह्या चार्ट्सला “ओ यच यल सी चार्ट” अथवा “ओपन-हाई-लो-क्लोज” चार्ट असेही म्हंटले जाते. जुन्या काळी जेव्हा कॅण्डलस्टिक चार्ट जास्त प्रसिद्ध नव्हते तेव्हा ह्याच चार्ट प्रकाराला पसंती दिली जात. मी पण माझ्या पर्सनल ट्रेडिंगसाठी बार चार्टचाच उपयोग करतो कारण मला पर्सनली वाटते हे चार्ट किमतींना चार्टवर स्पष्ट स्वरुपात दाखवितात. जसे कि ओपेनिंग आणि क्लोसिंग प्राईसचे एकमेकांशी संबध अथवा मागचा क्लोज आणि आजचा ओपन ह्याचा संबध सरळ चार्टवर बघता येतो. हे सर्व रेलेशनस शोर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये खूप म्हत्वाचे असतात.

कॅण्डलस्टिक चार्ट: कॅण्डलस्टिक चार्ट अथवा जापनीज कॅण्डलस्टिक चार्ट हा एक मुख्यत: वितीय चार्टचा प्रकार आहे, ज्यात हा चार्ट, प्राईस मुवमेंटला ट्रेडिंगसाठी योग्य प्रकारे दाखवितो व विश्लेषित करतो. बार चार्ट आणि लाईन चार्ट एकत्र केल्यास आपणस कॅण्डलस्टिक चार्ट मिळतो. ह्या चार्ट मध्ये प्रत्येक कॅण्डल हि चार डेटा पॉइंट्स पासून बनलेली असते, ते म्हणजे ओपन, हाय, लो आणि क्लोज. हे सर्व शोर्ट-टर्म मध्ये चार्ट वर विविध ट्रेडिंग पैटर्न निर्माण करतात जे कि एका ट्रेडर साठी खूप उपयोगाचे असतात. कॅण्डलस्टिक चार्ट हा मार्केट मध्ये सर्वात ज्यास्त वापरत येणारा चार्टचा प्रकार आहे जो कि शेयर आणि करंसी मार्केट मध्ये सर्वात ज्यास्त वापरला जातो. कॅण्डलस्टिक चार्टचा प्रथम उपयोग १८५० मध्ये झाला होता. ह्या चार्ट प्रकाराचे निर्माण प्रसिद्ध तांदूळ व्यापारी “होम्मा” ने केले होते जो जपानच्या “सकाता” नावाच्या गावचा होता.

कॅण्डलस्टिक चार्ट मध्ये क्लोज नुसार कॅण्डलच्या बॉडीचा रंग लाल किंवा हिरवा असतो आणि वरील आणि खालील रेषेला “शाडो” अथवा “विक” असे म्हणतात. ओपन आणि क्लोज मधील जागेला “बॉडी” असे संबोधले जाते. विक हि रेषा त्यावेळेसच्या हाय आणि लो ची ट्रेडेड प्राईस दाखवते, तर बॉडी हि ओपन आणि क्लोज ची रेंज दर्शविते.

चार्ट मध्ये सामान्यतः जेव्हा स्टॉक ओपनच्या व बंद होतो तेव्हा त्याच्याबॉडीचा रंग हा हिरवा दाखवला जातो तर जेव्हा स्टॉक ओपनच्या खाली बंद होतो तेव्हा त्याच्या बॉडीचा रंग हा लाल दाखवला जातो. पण काही काही चार्ट मध्ये जर स्टॉक मागच्या क्लोज च्या खाली बंद होतो तर त्याच्या बॉडीचा रंग हा लाल दाखविला जातो आणि जर स्टॉक मागच्या क्लोजच्या वर बंद होतो तर बॉडीचा रंग हा हिरवा दर्शविला जातो. कॅण्डलस्टिक चार्ट हा किमतीची दिशा, चार्ट वर अचूक दाखवून ट्रेडर्सना ट्रेंड फॉलोकरून फायदा कमविण्यास मदत करतो.

पॉइंट आणि फिगर चार्ट : पॉइंट आणि फिगर चार्टमध्ये किमती ह्या त्यांच्या दिशेनुसार दर्शविल्या जातात आणि हा चार्ट प्रकार वेळेला हिशोबात घेत नाही. पॉइंट आणि फिगर चार्ट मध्ये किमती “X” आणि “O” च्या कॉलममध्ये दाखविले जातात. ह्यात “X” चा कॉलम वाढणाऱ्या किमती दर्शवितो तर “O” हा कॉलम किमतीची घसरण दाखवितो. पॉइंट आणि फिगर चार्ट मध्ये टाइम फैक्टर नसतो. हा चार्ट ज्या प्रमाणे किमती वाढतात आणि घटतात त्या अनुरूपात आलेखीत होत राहतो. जर किमतीत प्रमाणापेक्षा जास्त बदल होत नाही तर चार्ट मध्ये हि जास्त काही बदल दिसत नाही. क्लासिकल ३ बॉक्स रेवेर्सल- पॉइंट एंड फिगर चार्टमध्ये किमती जो पर्यंत ३ बॉक्सच्या प्रमाणाच्या बाहेर जात नाही व रेवेर्सल देत नाही तो पर्यंत चार्ट वर नवीन कॉलमचे निर्माण होत नाही. ३ बॉक्स रेवेर्सल मेथड, पॉइंट एंड फिगर चार्टमध्ये सर्वात कॉमन पद्धत आहे. ह्या चार्ट प्रकारचा उपयोग फक्त महत्त्वपूर्ण प्राइस मूवमेंट पकडण्यासाठीच नाही तर मुख्य सपोर्ट आणि रेजिस्टेंस लेवेल्स ओळखण्यासाठी सहज केला जाऊ शकतो.

 

 

दुसरे माइनर चार्ट टाइप्स खालील प्रमाणे आहेत :

 

वॉल्यूम कैंडलस्टिक चार्ट : वॉल्यूम कैंडलस्टिक चार्ट हा चार्ट प्रकार कैंडलस्टिक चार्टप्रमाणेच असतो फक्त ह्यात वॉल्यूमचे एक नवीन डायमेंशन ऐड केलेले असते जे की कैंडलस्टिकची रुंदी वॉल्यूमनुसार दाखवलेली असते. जर त्या कैंडलच्या वेळेस जर वॉल्यूम जास्त असेल तर कैंडल ची रुंदी जास्त असते आणि वॉल्यूम कमी असेल तर कैंडल अरुंद रहातात. चार्टच्या खाली सुद्धा वॉल्यूम उभ्यारेषेच्या स्वरूपात चार्ट वर दाखविले जाते. एक लाल कैंडल म्हणजे लोवर क्लोजचा दिवस आणि हिरवी कैंडल म्हणजे हायर क्लोजचा दिवस.

चार्टिस्ट लोग हा चार्ट डेली बेसिस पर प्लाट करूँन त्यात वेगवेगळ्या शेपस और पैटर्न्स शोधतात जे की कीमतिंची दिशा निर्धारित करण्यास मदत करतात. ट्रेडर्स ना माहित असते की कीमतों ची दिशा अथवा ट्रेंड रेवेर्सल स्ट्रांग असेल जर त्याला वॉल्यूमची साथ मिळेल ह्याच कारणामुळे वॉल्यूम कैंडलस्टिक चार्टचा उपयोग ट्रेडिंग मध्ये केला जातो.

 

बेसलाइन डेल्टा चार्ट : बेसलाइन डेल्टा चार्टमध्ये किमतीना लाइन चार्ट प्रमाने दाखविले जाते जी एक बेस लाइन च्या आजुबाजुला फिरत राहते. बेसलाइन च्या वरील भागाला हिरव्या रंगात दाखविले जाते तर बेसलाइनच्या खालच्या भागाला लाल रंगात रंगविले जाते. बेसलाइन डेल्टा चार्टमध्ये डाव्या बाजूला मेजर क्लोसिग वैल्यू लाइन सुरु होते जिलाच बेसलाइन म्हंटले जाते. हा चार्ट प्रकार बेसलाइनपासून किमतिंची पॉजिटिव आणि नेगेटिव साइड वर दुरी मोजतो. हा चार्ट मुख्यतः इंट्रा डे चार्ट म्हणून वापरला जातो आणि हयात डाव्या बाजूला दिवसाचा ओपन सुरु होतो आणि उजव्या बाजूला दिवसभराची मार्केटची हालचाल रेखित होत राहते.

स्कैटर प्लोट चार्ट : स्कैटर प्लोट चार्टमध्ये डेटा पॉइंट्स x आणि y अक्षावर आलेखित केले जातात. स्कैटर प्लोट चार्ट ला स्टेटिस्टिक्स मध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे कारण हा कीमतीचा ट्रेंड सोबतचा संबंध स्पष्ट पणे चार्टवर दाखवतो. जर कीमतीचा ट्रेंड सोबत काही संबंध नसेल तर डेटा पॉइंट्स अक्षावर इकडे तिकडे पसरलेले दिसतात. आणि कीमतिंचा ट्रेंड सोबत घनिष्ट संबंध असेल तर डेटा पॉइंट्स ट्रेंड लाइनच्या जवळ असतात आणि त्या सोबतच रहातात. ह्याचमुळे हा चार्ट, एक व्यवस्थित डेटा, कीमत और ट्रेंडचा संबंध स्पष्ट बघण्याचे साधन आहे.

 

हैकेन आशी टेकनिक चार्ट : हैकेनआशी टेकनिक चार्ट अथवा ज्याला “एवरेज बार चार्ट” पण म्हटले जाते, एक जापानीज चार्ट टेकनिक आहे जी कैंडलस्टिक चार्ट ला अजून रीफायीन करून दर्शविते. ज्यामुळे ट्रेंड और फ्यूचर प्राइसेस चा योग्य पद्धतीने अंदाज बांधता येतो. आजकाल खूप ट्रेडर्स हि चार्ट स्टाइल ट्रेडिंग मध्ये उपयोगात आणत आहेत कारण कि ह्यात ट्रेंड सोप्या पद्धतीने ओळखता येतो आणि वोलाटिलिटी पासून मुक्तता मिळते.

हैकेनआशी टेकनिक चार्ट मागच्या कैंडलच्या ओपन-क्लोज डेटाचा उपयोग करून आणि वर्तमान कैंडलच्या ओपन-हाई आणि लो चा उपयोग करून एक कॉम्बो कैंडल तैयार करतो. ज्यात कीमतीमध्ये निर्माण झालेल्या नॉइज़चे फ़िल्टर होऊन ट्रेंड प्रमाणे कैंडल्स तयार होत जातात. जापानीज भाषेमध्ये हैकेनचा अर्थ होतो “एवरेज” और आशी चा अर्थ होतो “पेस” म्हणजे दोघांचा अर्थ होतो हैकेनआशी म्हणजेच कीमतीची एवरेज पेस एक्शन.

कागी चार्ट : कागी चार्ट ची चार्टिंग स्टाइल पण मार्केटच्या प्राइस एक्शन वर आधारित आहे आणि हा चार्ट पण टाइमला काहीच महत्व देत नाही. कागी चार्ट, एक सिंपल लाइन चार्ट प्रमाणे आहे ज्यात जेव्हा कीमती एक निर्धारित मात्रा ने दिशा बदल करतात तेव्हा चार्ट वरील लाइन पण त्याच मात्रेत दिशा बदल करते. कागी चार्ट मध्ये यिंग और यांग लाइन असतात ज्याची जाडी आणि दिशा, कीमतीनी नवीन हाई वा लो बनवल्यावर चेंज होत असते. कागी चार्टचा उपयोग इन्वेस्टर्स ज्यास्तकरून स्टॉकमध्ये बेस्ट कीमत शोधून त्या ठिकाणी पैसा लावण्यासाठी करतात. कारण कि कागी चार्ट मध्ये टाइम फैक्टरला काहीही महत्त्व नाही आणि चार्ट लाइन ची दिशाबदल फ़क्त विशिष्ट मात्रेमध्ये कीमतीत बदल झाल्यासच होते.

 

 

थ्री लाइन ब्रेक चार्ट :  थ्री लाइन ब्रेक चार्ट एक जापानीज चार्टिंग स्टाइल आहे जी कागी आणि रेनको चार्ट प्रमाणेच काम करते. येथे सुद्धा टाइमला काहीच महत्त्व नाही दिले गेलेले आणि चार्टवर चेंज तेव्हाच येतो जेव्हा कीमती एक विशिष्ट मात्रा मध्ये बदल होतात. थ्री लाइन ब्रेक चार्ट, हिरव्या आणि लाल रंगाच्या लाइन ने बनतो, ज्यात हिरवी लाइन वाढत्या कीमती दाखवतो तर लाल रंगाची लाइन पडत्या कीमती दर्शविते. ह्या चार्ट मध्ये लाईन’स त्याच दिशामध्ये वाढत रहातात जोपर्यंत रेवेर्सल होत नहीं. जेव्हा क्लोजिंग प्राइस मागील २ लाईनचा हाई अथवा लो पार करते तेव्हा रेवेर्सल मूव चार्ट वर निर्माण होते. थ्री लाइन ब्रेक चार्टचा मुख्य उपयोग सपोर्ट आणि रेजिस्टेंस शोधण्यासाठी, ब्रेकआउट शोधण्यासाठी आणि क्लासिक चार्ट पैटर्न्सचा पत्ता लावण्यासाठी प्रामुख्याने केला जातो.

 

 

रेंज बार चार्ट : रेंज बारचे निर्माण कीमती आणि वोलाटिलिटी ला ध्यानात ठेवून बनवले आहे म्हणजेच याचा अर्थ एक वेळेस एक विशिष्ट प्राइस मूवमेंट आली तरच चार्ट वर नविन बार बनतो आणि बार ची संख्या वोलाटिलिटी किती आहे हे दर्शविते. ट्रेडर्स आणि इन्वेस्टर्सना बार चार्टच्या बाबतीत माहित आहे की ३० मिनटाच्या टाइमफ्रेम मध्ये १ मिनटों चे ३० बार दिसतात, पण रेंज बार चार्ट वर ही बारची संख्या त्या वेळेसच्या वोलाटिलिटी वर अवलंबून असते आणि ही कितीही असू शकते. याचा अर्थ असा होतो की ज्यास्त वोलाटिलिटी असताना चार्ट वर ज्यास्त संख्येत बार बनतील आणि जर वोलाटिलिटी कमी असेल तर बार ची संख्या कमी राहिल. रेंज बार चार्ट वेळेनुसार मार्केटमध्ये निर्माण होणारा बेकारचा नॉइज़ला फ़िल्टर करून एक सरल आणि स्पष्ट चार्ट निर्माण करतो. हे घडते कारण की प्रत्येक बार ह्या चार्टमध्ये एकाच साइज़चा असतो म्हणूनच ह्या चार्ट मध्ये क्लियर कट ट्रेंड नजरेस पडतो आणि टाइम फैक्टर नजरअंदाज होतो.

 

रेनको चार्ट : रेनको चार्ट हा चार्टचा एक प्रकार आहे ज्यात चार्ट ला फक्त किमतीच्या दिशेशीस मतलब असतो आणि टाइम आणि वॉल्यूम हे तितके ह्या चार्ट मध्ये महत्वाचे नसतात. रेनको शब्द जापानीज शब्द “रेंगा” शब्दापासून उत्पन्न झालेला आहे ज्याचा अर्थ होतो “वीट”. रेनको चार्ट लाल आणि हिरव्या रंगाच्या विटाना तिरक्या दिशेत आखून बनत राहतो, आणि नवीन हाय अथवा लो बनल्यावरच नवीन वीट चार्ट मध्ये जोडली जाते. रेनको चार्ट हा जवळपास पॉइंट आणि फिगर चार्ट प्रमाणेच असतो. फर्क एवढाच आहे कि येथे X आणि O चे कॉलमच्या ऐवजी चार्टचे निर्माण लाल आणि हिरव्या विटापासून होते, जी एक फिक्स प्राइस मूवमेंट दर्शविते. ह्या विटाना ब्लॉक्स अथवा बॉक्सेस पण म्हटले जाते. ह्या ४५ अंश च्या कोनात खाली वर होत राहतात. अपट्रेंड ला हिरव्या रंगाच्या विटांच्या शृंखलेने दाखवले जाते तर डाऊन ट्रेंड ला लाल रंगाच्या विटांच्या शृंखलेने दाखवले जाते. रेनको चार्टचा उपयोग सपोर्ट आणि रेजिस्टेंस शोधण्यासाठी योग्य प्रकारे करता येवू शकतो.

हे सर्व मुख्य आणि गौण प्रकारचे चार्ट चे प्रकार आणि त्याची प्रारंभिक माहिती आहे. हे सर्व चार्ट प्रकार पारंपारिक आणि गैरपारंपारिक ट्रेडिंग मध्ये नियमित उपयोगात येतात. येणाऱ्या आर्टिकल्समध्ये आपण ह्या सर्व चार्टचे प्रकार आणि स्टाइल्सचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. आणि चार्टच्या प्रकारानुसार प्रोफेशनल प्रॉफिट मेकिंग स्ट्रेटेजी’ज समझुन घेवू आणि काही प्रैक्टिकल उदहारणे सुद्धा बघू.

The Author

Pramod Baviskar

Professional Market Trader And Owner Of Dalal Street Winners Advisory And Coaching Services. Working Since 2007 And Online Presence Since 2010. We Provide Highly Accurate And Professional 1 Entry And 1 Exit Future, Option, Commodity, Currency And Intraday Stock Tips On Whatsapp With Live Support And Follow Up.
COPYRIGHT © 2009-2018. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy

This website is best viewed using Microsoft Internet Explorer 9 or higher, and/or latest version of Google Chrome and Mozila Firefox browsers.