फायदा कमवण्यासाठी ट्रेंडला बनवा आपला मित्र

ट्रेडिंग मध्ये ट्रेंड सर्वात महत्वाचा

जर आपण कोणत्याही चार्ट चे निरीक्षण कराल तर आपल्याला किमती डोंगर आणि दऱ्या यांच्या आकृतिबंध निर्माण करताना दिसतील. हि रचना “लाईन चार्ट” वर अगदी स्पष्ट दिसते. हि रचना किमती सारख्या वर आणि खाली होत असल्यामुळे तयार होतात. किंमती सामान्यतः ट्रेंडमध्ये राहतात आणि कधी कधी हे ट्रेंड सामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ टिकतात आणि क्रमीत होतात. फायदा कमवण्यासाठी ट्रेंडला बनवा आपला मित्र

ट्रेंड म्हणजे काय ते समजून घ्या ?

ट्रेंड हे त्यांच्या दिशा आणि बाजू नुसार तीन प्रकारचे असतात. “अप ट्रेंड” मध्ये किमती ह्या वाढतात कारण बाजारात मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो. त्यानंतर “डाऊन ट्रेंड” मध्ये किंमती मध्ये घट व्हयला लागते वा किंमती पडतात कारण बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो. कधी कधी पुरवठा नसून सुद्धा किंमती पडायला लागतात कारण बाजारात मागणी नाहीच्या बरोबर असते म्हणून.   अधिक माहितीसाठी वाचा : जागतिक शेअर बाजारांचा इतिहास   ट्रेंड चा तिसरा प्रकार म्हणजे “साईड ट्रेंड”, ज्या मध्ये किंमती एका सीमेच्या आत अडकून तिथेच फिरत राहतात. हा ट्रेंड मार्केट मध्ये निर्माण झालेल्या दुविधेमुळे निर्माण होतो. हे सर्व प्रकारचे ट्रेंड आपण चार्टचे विविध वेळ लावून तपासू शकतात. मासिक वा साप्ताहिक चार्ट चे ट्रेंड हे मुख्य ट्रेंड असतात आणि ते एका निवेशाकाच्या आणि तितकेच एका ट्रेडरच्या कामाचे असतात. दैनिक आणि इंट्रा डे ट्रेंड हे दुय्यम स्वरूपाचे असतात आणि फक्त ट्रेडर च्या कामाचे असतात. ट्रेंड चा उपयोग करणे

ट्रेंड चा उपयोग करणे

ट्रेडिंगचा पहिला नियम आहे कि ट्रेंड ओळखायचा आणि त्याच्या दिशेने ट्रेड टाकायचे. हीच साधी आणि सरळ पद्धती फायदेशीर असते. ह्यामुळेच ट्रेंड ला ट्रेडर चा मित्र म्हणून संबोधले जाते. जे ट्रेडर ट्रेंड फॉलो करतात ते इतरांपेक्षा अधिक फायदा कमवितात आणि यशस्वी होतात. नवीन ट्रेडर वा नव सिखे ट्रेडर हाच नियम पाळत नाही आणि ट्रेंड च्या विरुद्ध दिशेने ट्रेड करून सारखा तोटा करत राहतात. आणखी नवीन ट्रेडरनां साईड ट्रेंड पण अडकवून ठेवतो व नुकसान करत राहतो.   जाणून घ्या : शेअर बाजारातील विविध चार्ट आणि त्यांचे प्रकार   नवीन ट्रेडर्स नी त्यांचा दृष्टीकोन हा कमी नुकसान आणि अधिक फायदा होईल ह्या प्रकारचा ठेवायला हवा. कारण सुरवातीच्या काळात नवीन ट्रेडर कडून अनेक चुका होत असतात आणि मार्केट मध्ये चुका म्हणजे नुकसान असते. नवीन ट्रेडर्स नि कमी जोखीम आणि ज्यास्त फायदा असणाऱ्या ट्रेडच टाकायला हव्या. अनेक ट्रेडर चुकीच्या ट्रेडस ना निवेश म्हणून ठेवतात आणि ती एक घोड चूक होती हे त्यांच्या नंतर लक्षात येते. हि चूक प्रत्येक ट्रेडर एकदा तरी त्याच्या ट्रेडिंग जीवनात करतोच करतो. ट्रेडिंग हि जोखीम आणि लाभ ह्याशी संबधित असते न कि मुल्याकानाशी. टेक्निकल ट्रेडिंग मध्ये एका ट्रेडर ला ज्यास्त लाभ आणि कमी जोखीम अशी उपाय योजना शोधावी लागते आणि ती अमलात आणून त्या पद्धतीने ट्रेडिंग करून मार्केट ला हरवायचे असते. बाजारात प्रत्येक ट्रेडर हा वेगळा असतो , त्याचे प्राधान्य वेगवेगळे असतात आणि त्याच्या लाभ आणि जोखमीचा अनुपात हि विभिन्न असतो. यशस्वी ट्रेडर

यशस्वी ट्रेडर

एका शिस्तबद्ध ट्रेडर चा मूलमंत्र म्हणजे ट्रेंड फॉलो करणे आणि जोखीम कधीच नाही विसरणे. ह्याचमुळे व्यावसायिक ट्रेडर अधिकतर वेळेस नफ्यात राहतात. आणि बाकीचे नुकसान भोगत रहातात. शिस्तीशिवाय ट्रेडर म्हणजे ब्रेक विना गाडी जिचा अक्सीडेंट ठरलेलाच असतो. तुम्ही नियम न पाळता एक किंवा दोन वेळेस नशीबवान ठरू शकाल, पण त्यानंतर नुकसान हे ठेवलेलेच असते.   बाजारात नफा मिळवण्यासाठी उघडा : टेक्निकल अनालिसिस चा जादुई डब्बा   व्यावसायिक ट्रेडर नि निर्माण केलेली म्हण आहे “ फायदा वाढू द्या आणि नुक्सानातून निघून जा”. हि समझ आणि अनुभव फक्त आणि फक्त शिस्तप्रिय ट्रेडिंग मधूनच मिळू शकतो. आणि हेच कारण व्यावसाईक ट्रेडर आणि सामान्य ट्रेडर मध्ये अंतर निर्माण करत चालते. एक यशस्वी ट्रेडर साठी टायमिंग हेच सर्व काही असते. यशस्वी ट्रेडर स्वस्त विकत घेतात आणि महागात विकून फायदा कमवितात. ते सर्व अप ट्रेंड असताना खरीदी करतात आणि डाऊन ट्रेंड सुरु झाला कि नफा वसूल करत चालतात.

COPYRIGHT © 2017. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy