बाजारात किमत नेहमी महत्वाची असते

किमतीच्या बाबतीत सर्व काही

बाजारात किमती ह्या गर्दीच्या देवाण घेवाणावरून ठरतात. खरीददार आणि विक्रेता यांच्यातील रस्सीखेचामुळे बाजारात किमती शोधल्या जातात आणि नंतर निश्तित होतात. किमतीमध्ये बाजाराची रूपरेषा , बाजाराची आधारभूत माहिती, बातम्या आणि लोकांचे समज आणि गैरसमज हे सर्व सम्मेलीत असतात. ह्यालाच “मार्केट डिस्काऊंट मेकानीस्म” म्हटले जाते.

ज्या पद्धतीने बाजारात बातम्याचा ओघ बदलतो, बाजाराच्या मुलभूत बाबी बदलतात त्या वेगाने आपणास बाजारात किमितीमध्ये बदल होताना दिसतो. बाजाराच्या मुलभूत बाबीमध्ये शेकडो गोष्टी सामील असतात. जसे कि मार्केट व शेअर्सचे तथ्य, बाजाराचे विचार, अत्यंत टोकाचे निर्णय, बाजाराच्या बातम्या आणि लोकांचे समज आणि गैरसमज. ह्या सर्व गोष्टी बाजारात कायम पुरवठा आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण करत राहतात, त्त्यामुळेच आपण बाजारात प्रत्येक सेकंदाला किमतींमध्ये बदल अनुभव करत असतो.

 

 

 

 

डोव थेअरी आणि किमंतीचा संबंध

चार्लस डॉव याने “ द वाल स्ट्रीट जर्नल” ह्या वृत्तपत्राची स्थपना केलेली आहे. ज्याच्यानुसार बाजारात एकच गोष्ट भरवसा करण्यालायक आहे आणि ती म्हणजे “किमत”. त्यांच्या मते बाजारात अफवा, तथ्य आणि बाजाराचा गोंधळ असताना सुध्दा किमती ह्या त्यांचे मार्गक्रमण करणे सोडत नाहीत. माझ्यामते सुद्धा बाजारात जी एक गोष्ट समोर दिसते आणि जिच्यावर ट्रेडर विश्वास ठेवू शकतो ती म्हणजे “किंमत” होय.
चार्लस डॉव याने बाजाराचे जवळून निरीक्षण केले आणि त्यांना अधोरेखित केले त्याला आज “डॉव थेअरी” ह्या नावाने संबोधले जाते.

डॉव थेअरीची ठळक वैशिष्ट्ये

१. किमती ह्या सारख्या ट्रेंड मध्ये मार्गक्रमण करतात.
२. एक ट्रेडर ट्रेंड चार्टवर पाहू शकतो आणि सहज ओळखू शकतो. ट्रेंड हे नियमित रूपाने तयार होतात आणि पुनरावृत्तीत होतात.
३. प्रायमरी ट्रेंड हे मुख्य असतात, तर सेकंडरी ट्रेंड ला दुय्यम ट्रेंड वा “रीत्रेसमेंट” म्हणतात. जे ट्रेड करण्यासाठी वापरले जातात.
४. प्रायमरी ट्रेंड हे त्यांच्या दिशेत सहसा बदल करत नाहीत जो पर्यंत बाजारात काही मुख्य वा मुलभूत बदल घडून येत नाही.

अधिक माहितीसाठी वाचा : ट्रेंड हाच ट्रेडर्स चा खरा मित्र

 

किंमत आणि मूल्य

किंमत आणि मूल्य ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने ट्रेडर योग्य किंमत शोधू शकतो तर फंडामेंटल अनालिसिस च्या मदतीने योग्य मूल्य निर्धारित केले जाऊ शकते. जे शेअर्स आपल्या मूल्यापेक्षा जास्त किंमतीवर ट्रेड होतात त्यांना “ओवर व्यालूड शेअर्स” म्हणतात. हे त्या कंपनी च्या उज्ज्वल आणि संपन्न भविष्यच्या अपेक्षेमुळे, बाजारातील अफवा आणि ट्रेडर्स च्या भावनांमुळे घडते.

जर शेअर्स ची किंमत त्याच्या मूल्यापेक्षा जास्त किंमतीवर ट्रेड करत असेल, तर मूल्य आणि वर्तमान किंमत यातील फरकाला “ प्रीमिअम” म्हटले जाते. त्याच प्रकारे जर शेअर मूल्यापेक्षा कमी किंमतीवर ट्रेड करत असेल तर त्या फरकाला “डिस्काऊंट” म्हटले जाते.
हे प्रीमिअम आणि डिस्काऊंट एका निवेशकाच्या कामाचे असतात. तर एक चांगला ट्रेडर चांगले फंडामेंटल असलेल्या शेअर्स मध्येच टेक्निकल अनालिसिस ची मदत घेवून ट्रेडिंग करतो. तो योग्य संधीची वाट पाहतो आणि त्या संधीला योग्य जोखीम घेवून फायद्यात रुपांतरीत करतो. ह्या प्रकारे एका यशस्वी ट्रेडर ची दैनंदिनी असते.
चला ह्याला एका चांगल्या उदाहरणाद्वारे समझुन घेवूया. मंदीमध्ये बाजारात सर्व काही पडत असते पण ब्लू चीप शेअरचे भाव हे स्माल आणि मिडकॅप शेअर्सच्या मानाने कमी पडतात, त्याचे कारण म्हणजे त्याचे फंडामेंटल. मुख्य इंडेक्स शेअर्स जसे कि निफ्टी आणि बँक निफ्टीचे मुख्य शेअर्स मध्ये ट्रेडिंग करणे हे इतर शेअर्सच्या पेक्षा कमी जोखमीचे असते. कारण ते भारतातील मुख्य कंपन्या असून त्याचे फंडामेंटल, कंपनी व्यवस्थापन , गुणवत्ता इत्यादी इतर सर्व कंपन्यापेक्षा उच्च प्रतीचे असते. ह्याच आधारावर मुख्य कंपन्या इंडेक्स मध्ये सामील वा बाहेर होतात.
टेक्निकल अनालिसिस सोबत फंडामेंटल अनालिसिस हे एका उत्प्रेराकाप्रमाणे काम करते. ज्यामुळे ट्रेडर्स ची जोखीम कमी राहूनहि त्याला जास्त फायदा मिळण्याची संधी मिळते. त्याचमुळे व्यावसाईक ट्रेडर्स नेहमी चांगल्या फंडामेंटल असलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्येच ट्रेडिंग करतात. टेक्निकल अनालिसिस ट्रेडर्स ला खारीदीची वा विक्रीची योग्य वेळ आणि किंमत सुचवते.

किंमती आणि टेक्निकल अनालिसिसचा उपयोग

टेक्निकल आनालीसीस चा उपयोग ट्रेडिंग कम्युनिटी साठी काही नवीन नाही, ह्याची सुरवात सन १८०० मध्ये जपानमध्ये तांदळाचे व्यापारी भविष्यातील किंमतीचा अंदाज बांधण्यासाठी करत.

टेक्निकल अनालिसिस हे ट्रेडिंग समाजातील बुद्धीजीवी लोकांनी शोधले आणि आजही विकसित करता आहेत. कारण टेक्निकल अनालिसिस सामान्य शब्दात हे किमतीच्या भविष्याचे जटील गणित होय. जे कि सामान्य मानवीच्या आवाक्याबाहेरचे आहे.

टेक्निकल अनालिसिस हे कॉम्पुटर, ट्रेडिंग सिस्टीम आणि चार्तींग सोफ्टवेअर ह्या सर्वांच्या शोधा पूर्वीपासून उपयोगात आहे आणि नियमित वापरले जायचे. तेक्निकॅल अनालिसिस हे मागच्या २०० वर्षापासून वापरले जाते आहे आणि पुढे हि अजून २०० वर्ष वापरले जाईल व विकसित केले जाईल.
दर वर्षी नवीन ट्रेडिंग सिस्टीम, इंडीकेटर्स आणि चार्ट चे नवनवीन प्रकार शोधले जात आहेत आणि विकसित करून उपयोगात आणले जात आहेत.

The Author

Pramod Baviskar

Professional Market Trader And Owner Of Dalal Street Winners Advisory And Coaching Services. Working Since 2007 And Online Presence Since 2010. We Provide Highly Accurate And Professional 1 Entry And 1 Exit Future, Option, Commodity, Currency And Intraday Stock Tips On Whatsapp With Live Support And Follow Up.
COPYRIGHT © 2009-2018. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy

This website is best viewed using Microsoft Internet Explorer 9 or higher, and/or latest version of Google Chrome and Mozila Firefox browsers.