शेअर बाजारांचा इतिहास

154186232

स्टॉक मार्केट ची व्याख्या

स्टॉक मार्केट वा इक्विटी मार्केट अथवा शेयर बाजार हि एक संस्थेप्रमाणे काम करते जेथे खरीददार आणि विक्रेता कंपनीच्या शेअर अथवा समभागांची आणि इतर आर्थिक साधनांची घेवाण-देवाण करतात. भूतकाळात शेअर्स हे भौतिक सर्टिफिकेटच्या स्वरुपात खरीदी-विक्री होत पण आता डीजीटल युगात हे सर्व काम शेअर बाजारात आभासी स्वरुपात आभासी मंचावर होते. आज पण वास्तविक स्वरुपात शेअर्स ची देवाण-घेवाण होते परंतु ते आता फक्त मोठ्या आर्थिक संस्था , निवेश बँका आणि मोठे व्यापारीच करतात. २०१२ संपता संपता जागतिक शेअर बाजाराचे एकूण भांडवल हे जवळपास ५५ लाख अब्ज डॉलर ऐवडे होते. त्यामध्ये अमिरीकन शेअर बाजाराचा ३४% हिस्सा होता तर जपान आणि इंग्लंडच्या बाजाराचा ६% सहभाग होता. जगामध्ये जवळपास ६० शेअर बाजार आहेत आणि त्याचे भांडवल एकत्र केले तर ते जवळपास ६९ लाख अब्ज डॉलर इतके भरेल. त्यातल्या १६ शेअर बाजारांचे भांडवल हे १ लाख अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे आणि ते जवळपास विश्व बाजाराचा ८७% हिस्सा व्यापतात. हे मुख्य शेअर बाजार ३ खंडानुसार विभागले गेले असून, आणि ते आहेत आशियायी, युरोपिअन आणि अमिरीकन शेअर बाजार. Stock exchange in India

भारतीय शेअर बाजार

भारतात मुख्यतः २ शेअर विनिमय संस्था आहेत. त्या म्हणजे NSE ( नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ) आणि BSE ( बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ). ह्याच दोन एक्सचेंजवर सर्वाधिक ट्रेडिंग होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे १८७५ मध्ये कार्यान्वित झाले तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज हे १९९२ मध्ये स्थापन झाले व १९९४ ला त्यामध्ये ट्रेडिंगला सुरुवात झाली. bse आणि nse दोन्ही वेग-वेगळे एक्सचेंजेस आहेत पण त्याची कार्यपद्धती, कार्य वेळ, सेटलमेंट पद्धत इत्यादी सर्व जवळपास सारखे आहेत. BSE अंदाजे ४७०० कंपन्या लिस्टेड आहेत तर हा आकडा NSE साठी १२०० च्या वर आहे. BSE च्या मुख्य ५०० कंपन्या बाजाराचा ९०% भांडवल भाग गृहीत करतात बाकी १०% शेअर्स हे कमी संख्येने ट्रेड होतात. How stock exchange works

शेअर बाजारची कार्यप्रणाली

शेअर बाजारात कंपन्या आप-आपले समभाग वा शेअर्स विकून भांडवल उभे करतात. या भांडवलचा उपयोग ते व्यवसाय वाढवण्यासाठी अथवा कर्ज कमी करण्यासाठी करतात. अधिकतम कंपन्या भांडवल उभारण्याचा हाच रस्ता निवडतात आणि प्राथमिक सार्वजानिक प्रस्तावाद्वारे ( IPO ) ते त्यांचे शेअर्स मार्केट मध्ये सामन्य नागरिकांना विकून पैसा गोळा करतात. कारण कर्ज घेवून त्यावर अधिक व्याज भरण्यापेक्षा कंपन्या कंपनीतील काही हिस्सा विकून पैसा गोळा करून त्याचा आधीचे कर्ज कामीकरण्यासाठी अथवा व्यवसाय विस्तारासाठी उपयोग करतात. हा रस्ता त्यांचासाठी साधा आणि सरळ असतो. कधी कधी कंपन्या अधिकचे कर्ज कमी करण्यासाठी FPO ( पुढील सार्वजनिक प्रस्ताव ) बाजारात आणतात. जे लोग कंपन्याचे शेअर्स खरीदी करतात ते त्या कंपनीचे त्या प्रमाणात भागीदार बनतात. जर कंपनीला नफा झाला तर कंपनी त्यांना तो नफा लाभांश स्वरुपात वाटते. कंपनीचा नफा वाढत राहिला वा कंपनी चा चांगल्या प्रकारे व्यवसाय करत असेल तर कंपनीच्या शेअर्स ची मागणी वाढून त्यांचा भाव वधारतो. IPO द्वारा कंपनी शेअर बाजारात लिस्ट वा सामील होते आणि त्यानंतर तिच्या शेअर्स मध्ये ट्रेडिंगला सुरुवात होते. बाजार वेळेत एखादी व्यक्ती कितीही वेळेस ह्या शेअर्स मध्ये खरीदी अथवा विक्री करू शकते. बाजारात ट्रेडिंग घडून येण्यासाठी खरीददार आणि विक्रेता ह्या दोघांची गरज असते त्याशिवाय सौदा घडून येवूच शकत नाही. दोघांमध्ये ज्या भावात ट्रेडिंग घडून येते त्याला “ सौदा ” असे म्हणतात. मार्केट मध्ये सौदे हे लगातार वेगवेगळ्या भावाला पडत असतात त्यचे कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील असमतोल, बाजाराला प्रभावित करणाऱ्या बातम्या, बाजाराची दिशा आणि दशा. त्यामुळेच शेअर्स भाव हे कधी वर तर कधी खाली दिसून येतात. या सर्व गोष्टीमुळे बाजार दिवसेंदिवस अधिक जटील आणि अस्थिर होत आहेत पण टेक्नोलॉजीमुळे ट्रेडिंग हि अधिक सुलभ आणि स्वस्त होत आहे. सरळ शब्दात स्टॉक मार्केट मध्ये शेअर्सची खरीदी आणि विक्री होते. History of stock exchange in India

भारतीय शेअर बाजाराचा इतिहास

भारतात पहिला संघटीत शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो कि आशियातील सर्वात जुना बाजार आहे. १८९४ मध्ये कापड मिलच्या शेअर ट्रेडिंग साठी अहमदाबाद शेअर एक्सचेंज ची सुरुवात करण्यात आली. १९०८मध्ये कलकत्ता स्टॉक एक्सचेंज ची स्थापना जूट अंड संबधित गोष्टीच्या कंपनीच्या शेअर ट्रेडिंग साठी सुरुवात करण्यात आली. मद्रास स्टॉक एक्सचेंज ची स्थापना १९२० मध्ये झाली. भारतात जवळपास २४ स्टॉक एक्सचेंज होते आणि त्यापैकी २१ स्टॉक एक्सचेंजची स्थापना प्रादेशिक उद्योग धंद्यांना चालना मिळावी यासाठी करण्यात आली. सुधारणा प्रणालीतून २ मुख्य एक्सचेंज अस्तितवात आले ते म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि ओवर द काउंटर एक्सचेंज ऑफ़ इंडिया (OICEI) ज्याचे काम आणि प्रसार हा राष्ट्रव्यापी आहे. स्टॉक एक्सचेंज हे गवर्निंग बोर्ड व कार्यकारी मुख्य अधिकारी चालवतात व नियंत्रित करतात. वित्त मंत्रालय ह्या दोघांना अधिनियमित आणि नियंत्रित करते. सेबी ची स्थापना १९८८मध्ये सरकारतर्फे करण्यात आली जी कि एक मार्केट रेगुलेटर व आर्थिक व्यापार संबंधी उद्योग व संस्था नियंत्रित व अधिनियमित करण्याचे काम करते. Stock market history

शेअर बाजारांचा वैश्विक इतिहास

१२व्या शतकात राजाचे मंत्री व अधिकारी हे शेतकऱ्यांना कर्ज वाटप आणि त्यांचे नियमन करीत असत. ह्या व्यक्ती हे करत असताना ह्या कामच्या बदल्यात फी आकारात आणि त्यामुळेच यांना जगातील “प्रथम दलाल” संबोधले जाते. एक आख्यायिका अशी पण आहे कि बेल्जियम देशाच्या ब्रुज शहरात कमोडिटी ट्रेडर्स वैन डे बुर्जे ह्याच्या घरी मिटिंग करण्यासाठी जमा होत आणि त्यातूनच १४०९मध्ये “ बुर्जे बौर्से ” ह्या जागेची स्थापना झाली. ह्याच प्रकारची मीटिंग हीच व्यक्ती बेल्जियम च्या अन्तवेर्प शहरात घडवून आणत जे कि त्यावेळचे सर्वाधिक व्यापारी व व्यापार असलेले शहर होते. त्यातूनच हि जागा कमोडीटी ट्रेडिंग करण्याची जागा बनून राहिली. हि बातमी आजूबाजूच्या शहरात व राज्यात पसरून त्याठिकाणी सुद्धा अशी केंद्रे सुरु झाली ज्यांना “बेउर्जें” म्हणत. १३व्या शतकात वैटिकन बँक अधिकारी सरकारी सिक्योरिटीज मध्ये ट्रेडिंग करायचे. १३५१ मध्ये सरकारने काही जणांवर बंदी लादली कारण ते अफवा पसरवून सरकारी फंड्स ची किमत कमी करण्याचे षड्यंत्र करत होते. हे बघून १४व्या शतकात इतर शहरे जसे कि पिसा , जेनोआ, वेरोना व फ्लोरेंस यांनी सुद्धा सरकारी सिक्योरिटीज मध्ये ट्रेडिंग ची सुरुवात केली. हे यामुळे शक्य झाले कारण ह्या शहरांवर व राज्यांवर राजाचा हुकुम नव्हता तर ती जनपरिषद मार्फत चालवली जायची. मार्केट मध्ये शेअर्स उतरवणारी पहेली कंपनी हि इटालीयन होती. हीच परम्परा इंग्लंड व आजूबाजूच्या देशात १६व्या शतकापर्यंत पोहचली. १६०२ मध्ये डच इस्ट इंडिया कंपनी जी कि एक जॉइंट स्टॉक कंपनी होती व जिने फिक्स कैपिटल शेयर मार्केट मध्ये उतरवले होते, त्यामुळेच ह्या कंपनीचे शेअर्स विविध एक्सचेंजावर एकाच वेळेस ट्रेड होवू शकत होते. ह्याचमुळे एम्स्टर्डम एक्सचेंज वर ऑप्शन आणि इतर डेरीवेटीव ट्रेडिंग ची सुरुवात झाली. डच ट्रेडर्सनी “शोर्ट सेलिंग” ची संकल्पना अस्तीत्वात आणली. आज जगातील प्रत्येक विकसित व विकानसील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. जगामध्ये अमेरिका,इंग्लंड, जपान, भारत ,चीन,कॅनडा व जर्मनी चे शेअर बाजार सर्वात मोठे बाजार म्हणून ओळखले जातात. History of the American stock market

अमिरीकेच्या शेअर बाजाराचा इतिहास

अमेरिकन स्टॉक एक्सचेंज ( AMEX ) ची सुरुवात सन १८०० मध्ये झाली. १९२१ पर्यंत ह्या एक्सचेंज ला “कर्ब एक्सचेंज” म्हणून सुद्धा ओळखले जायचे. ह्या एक्सचेंज आधिकारिक स्थापना १९२१ मध्ये झाली जेव्हा यांचे स्थानातरण ट्रिनिटी चर्च जवळील इमारतीत झाले. पण याची घोषणा १९५३ पर्यंत झाली नव्हती. नोव्हेंबर १९९८ ला ह्या एक्सचेंजचे विलानीकरण होवून “नैस्डेक-एमेक्स एक्सचेंज” ची स्थापना झाली. ऑक्टोबर २००८ मध्ये अमेरिकन स्टॉक एक्सचेंज चे अधिग्रहण NYSE euronext ने केले. तेव्हापासून हळूहळू सर्व माहिती व कामे NYSE एक्सचेंजवर हलवून AMEX बंद करण्यात आले. जानेवारी २००९मध्ये याचे आधिकारिक नामांकरण NYSE AMEX झालेले आहे.

The Author

Pramod Baviskar

Professional Market Trader And Owner Of Dalal Street Winners Advisory And Coaching Services. Working Since 2007 And Online Presence Since 2010. We Provide Highly Accurate And Professional 1 Entry And 1 Exit Future, Option, Commodity, Currency And Intraday Stock Tips On Whatsapp With Live Support And Follow Up.
COPYRIGHT © 2009-2018. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy

This website is best viewed using Microsoft Internet Explorer 9 or higher, and/or latest version of Google Chrome and Mozila Firefox browsers.