शेअर बाजाराला कसे हरवायचे

शेअर बाजाराला हरवणे म्हणजे मार्केट बेचमार्क पेक्षा जास्त परतावा मिळवणे होय . उदारणार्थ, जर आज मार्केट बेचमार्क इंडेक्स १% वर आहे आणि तुम्ही २% वा अधिक परतावा मिळवला तर त्याचा अर्थ होता आज तुम्ही मार्केट ला हरविले. हे ऐकण्यास जरी सोपे वाटत असले तरी दीर्घ काळात हे करणे इतके सोपे नसते. शेअर बाजाराला कसे हरवायचे याचेच दुसरे उदाहरण म्हणजे जर शेअर बाजाराच्या मुख्य इंडेक्स ( वाचा : शेअर बाजाराचा इतिहास ) ने एका वर्षात २५% परतावा दिला आणि आपण आपल्या भांडवलावर २५% पेक्षा जास्त परतावा मिळवता तेव्हा तुम्ही मार्केट ला हरवीनाऱ्या व्यावसाईक ट्रेडर पैकी एक होता. जगात रोज हजारो व्यावसाईक ट्रेडर्स टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने मार्केट ला पछाडत असतात.

टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने मार्केटला हरवा !

टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने मार्केटला हरवा ! टेक्निकल अनालिसिस आणि ते शिकण्याचा उद्देशच मुख्यतः मार्केट ला हरवणे आणि कमी जोखीम घेवून जास्तीचा परतावा मिळवणे असतो. जर आपणस वाटते कि हे शक्य नाही तर आपणास टेक्निकल अनालिसिस बद्दल खूप कमी ज्ञान आहे असे मी म्हणेल. मार्केट ला हरवणे हे इतके हि सोपे नसते हे सर्व जाणतात, कारण खूप सारे ट्रेडर्स दर वर्षी मार्केटच्या चढ आणि उतारात योग्य जोखीम व निर्णय न घेतल्यामुळे सर्वस्व गमवून बसले आहेत. जे उरलेले व्यावसाईक ट्रेडर्स आहेत ते हुशार आणि लवचिक होते जे मार्केट नुसार कमी जास्त जोखीम करून, टेक्निक मध्ये बदल आणि छोटा मोठा फायदा घेवून बाजूला होतात. ह्याच गोष्टी एक ट्रेडर ने आत्मसात करायच्या असतात.

बाजारात कुशलता आणि अनुभव म्हणजे पैसा

Drawing a risk-reward diagram जर आपणास एक व्यावसाईक ट्रेडर व्हयाचे असेल तर आपणास ट्रेडिंग ( वाचा : टेक्निकल अनालिसिस सोबत ट्रेडिंग यात्रा ) मध्ये कुशलता प्राप्त करावी लागेल, खूप सारी ट्रेनिंग घ्यावी लागेल आणि आपल्या अनुभव आणि चुकातून शिकण्याचे गुण अंगीकारवे लागेल. जसे एक चांगला शेफच एक चांगले रेस्टोरंट चालवू शकतो त्याच प्रमाणे एक चांगला ट्रेडर च मार्केट मध्ये जिंकू शकतो. मार्केट मध्ये दर वर्षी काही नासमज आणि मूर्ख नवशिके ट्रेडर्स येतात आणि कमी ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर मार्केट आणि किंमती ( वाचा : बाजारातील किंमतीचे महत्व ) न समजता मार्केट ला हरवण्याच्या गोष्टी करतात आणि त्याचे नंतर काय होते हे सर्वांनाच माहिती आहे. बाजारात चुकीच्या गैरसमजची प्रत्येक वेळेस किंमत चुकवावी लागते. जर आपणास एक चांगला ट्रेडर बनायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल, नव नवीन टेक्निक शिकाव्या लागतील आणि त्या पारखाव्या लागतील. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग ला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवाल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. ट्रेडिंग हा एक कठीण व्यवसाय आहे आणि तो कठीण निर्णयासोबत येतो. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काही १००% फायद्याची ग्यारंटी नाही ( वाचा : टेक्निकल अनालिसिस कधी काम करते आणि कधी नाही ) पण योग्य जोखीम आणि अनुभवासोबत तुम्ही मार्केटला टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने १००% हरवू शकतात. ज्याप्रमाणे एका शेफ ची आपली स्वतः ची एक वेगळी चव आणि पाककृती असते त्याच प्रमाणे प्रत्येक ट्रेडर ची स्वतः ची चार्ट वाचण्याची कला (वाचा : शेअर बाजारातील चार्टचे प्रकार ), मार्केट ची समज, अनुभव आणि जोखीम घेण्याची वे फायदा कमवण्याची क्षमता असते. त्याच मेले म्हणतात बाजारात कुशलता आणि अनुभव म्हणजे पैसा होय.

वेगळी आणि वैयक्तिक ट्रेडिंग पद्धती

बाजारात प्रत्येक ट्रेडिंग पद्धती प्रत्येकासाठी कामाची ठरत नाही. एक एकासाठी काम करते तर तीच दुसऱ्या साठी नुकसानदायक ठरते. कारण प्रत्येक ट्रेडर हा वेगळा असतो, त्याचे व्यक्तित्व , त्याचे लक्ष्य आणि त्याचे अनुभव हे सर्व वेगवेगळे असतात. कधी कधी चांगल्या पद्धतीही काही कामास येत नाही कारण जर ट्रेडरच जर आत्म विनाशकारी असेल आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जोखीम घेत असेल तर त्याचा मार्केट मध्ये शेवट ठरलेलाच असतो. योग्य टेक्निकल अनालिसिस पद्धती ( वाचा : टेक्निकल अनालिसिस चा उपयोग करावा कि नाही ? ) जी तुमच्या जोखीमानुसार आहे हे शोधणे फार जिकरीचे काम असते पण हे एकदाच करावे लागते आणि त्याची फळे पूर्ण आयुष्यभर खाऊ शकतात. मूर्ख ट्रेडर प्रत्येक नुकसानीत त्याच्या टेक्निकल अनालिसिस पद्धतीला कोसतात पण त्यांना स्वतः च्या चुका कधीच दिसत नसतात. त्याचमुळे टेक्निकल अनालिसिस चांगल्या पद्धतीने शिका आणि त्याला स्वतः च्या वैयक्तिक जोखिमी नुसार वापरा हाच जिंकण्याचा मूलमंत्र आहे.

COPYRIGHT © 2017. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy