स्टॉक मार्केटची भविष्यातील मूवमेंट कशी प्रेडिक्ट करतात?

ह्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत कि कसे प्रोफेशनल ट्रेडर्स वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग दर दिवशीची मार्केटची चाल आणि मुवमेंट प्रेडीकट करण्यासाठी आणि त्याचे परिणाम जाणण्यासाठी करतात.

 

मार्केटची व्याख्या : मार्केट म्हणजे खरीददार आणि विक्रेता ह्यांच्या व्यवहाराचा परिणाम होय. ह्यालाच “क्राउड” असेही म्हटले जाते. ह्यालाच “मार्केट क्राउड” असेही म्हणतात. हेच लोक मार्केट मध्ये किंमतीची स्थापना करतात. मार्केट मध्ये किंमती सामान्यपणे अवेरेजच्या आजू बाजूला फिरत राहतात. जेव्हा मार्केट ट्रेंडीग असते तेव्हा मार्केटच्या चालीचा अंदाज आणि भविष्यवाणी खालील संकेत समजून आणि त्याच्या लक्ष केंदित करून फायदा कमावणारी ट्रेडिंग करता येवू शकते.

 

 • सप्लाई आणि डिमांड समजून घेणे.
 • क्राउडच्या व्यव्हारचे विश्लेषण करणे.
 • मार्केट मध्ये नार्मल काय असते ते माहित करणे आणि
 • मार्केटच्या टोकाच्या भूमिका ओळखून त्याला फायद्यात बदलने.

 

 

*मार्केट मधील सप्लाई और डिमांडची परिस्थिती समजून घेणे : प्रत्येक दिवशी मार्केट मध्ये जुनाट पद्धतीची अर्थशास्त्रीय सप्लाई डिमांड चे मॉडेल काम नाही करत त्याचमुळे बरेच ट्रेडर्स चुकीच्या निष्कर्षामुळे सदा नुकसानीत राहतात. जुनाट अर्थशास्त्रीय पद्धतीत जेव्हा किंमती वाढतात तेव्हा डिमांड आपोआप कमी होत जाते. आणि जेव्हा किंमती कमी होत जातात तेव्हा डिमांड हळूहळू वाढत जाते.

पण ह्या विपरीत रोजच्या स्टॉक मार्केट मध्ये  फ्यूचर मार्केट कमोडिटी मार्केट आणि करेंसी मार्केट मध्ये लिलावाचे मॉडल काम करते. लिलावाच्या मॉडल मध्ये जशी वस्तु की कीमत वर जाते तसतशी त्याची डिमांड वाढायला लागते. आणि जर त्या वस्तुत कोणालाही इंटरेस्ट नसेल तर ती वस्तू लिलावातून बाहेर टाकली जाते. लिलावात वस्तूच्या मुल किंमतीला अथवा “इंत्रेसिक वैल्यू” ला काहीच महत्व नसते. हेच ट्रेडर्सलोक रोजच्या रोज स्टॉक्सच्या इंट्रा डे चार्टवर हे सर्व पाहू शकतात आणि त्याचे विश्लेषण करू शकतात. एका दिवसात कंपनी फंडामेंटल लेवेल जास्त काही बदलत नाही तरी पण न्युज आणि मार्केट रिएक्शनमुळे कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीत मोठी उलाढाल होताना दिसते.

स्टॉक मार्केटमध्ये लिलावाच्या मॉडेलचा अभ्यास आणि समझ हेच एका ट्रेडर साठी महत्वाचे असते. ह्यांनी आपण डे टू डे मार्केट मूवमेंट्सची योग्य ओळख करून मार्केट मध्ये विजयी बनू शकतो.

*मार्केट मध्ये क्राउडचा व्यवहार : टेक्निकल ट्रेडिंग मध्ये सर्व काही क्राउडच्या हातात असते. क्राउडच्या सोबत जाणे म्हणजे मोमेंटम ला फॉलो करणे होय. ह्यामुळे मार्केट मध्ये “बैंडवैगन इफ़ेक्ट” तयार होतो. ह्या बैंडवैगन मध्ये मार्केट न्यूज फ्लोनुसार प्रत्येकजण वेगवेगळ्या लेवेलला बसतो.

आणि ह्यामुळे निर्माण झालेल्या मार्केट मूवमेंट्स पासून फायदा कमवायचे बघतो. पण ह्याच कारणामुळे पुढे चालून यातून मार्केट मध्ये “मानिया” आणि “पैनिक” वाली कंडीशन उत्पन्न होते. मार्केट मानिया मध्ये बयेर्स स्टॉकला भावनेच्या भरात खरीदी व विक्री करतात. आणि त्याच्या “इन्त्रेंसिक वैल्यू” ची काळजी करत नाही. आणि हा माल मी पुढे अधिक किमतीला विकू शकेल कि नाही ह्याची सुद्धा परवा ते करत नाहीत.

पैनिक कंडीशन मध्ये ह्याच्या एक्साक्ट्ली विपरीत घडते. पैनिक फेजमध्ये लोक काहीच लवकर आणि व्यवस्थित किमतीत विकू शकत नाही त्यामुळे ते पैनिक होवून कोणतीही किंमत स्वीकारण्यास तैयार होतात. कारण त्या स्थितीत त्यांना कोणताही हालतीत जो मिळेल तो पैसा वापस पाहिजे असतो. आर्थिक चक्रात “ मानिया आणि पैनिक” ची परिस्थिति एखादे वेळेस येते पण ट्रेडर्स च्या जीवन काळात हि परिस्थिती रोज उद्भवत असते.

प्प्रत्येक एक स्टॉक फ्यूचर कमोडिटी अथवा करेंसी मार्केट चा आपला एक विशीष्ट क्राउड असतो आणि त्या क्राउडनुसार मार्केट मध्ये किंमती ह्या खालीवर होत राहतात. स्मार्ट प्रोफेशनल ट्रेडर्स ह्या क्राउडचे विक पोइंट शोधत राहतात आणि त्या पोइंटसचा उपयोग ट्रेडिंग मध्ये फायदा कमावण्यासाठी करतात.

*मार्केट मध्ये नॉर्मल काय असते ते समजून घेणे : सामान्यतः  जे क्राउड विशिष्ट स्टॉक या कमोडिटीमध्ये नियमित ट्रेड करते त्यांना त्या स्टॉक या कमोडिटीची पूर्ण ओळख झालेली असते आणि त्यावरून ते त्यांचा डेली हाय आणि लो चे अंदाज बांधू शकतात. मार्केट मध्ये काही मोठे बदल झाले तर हे त्या क्राउडच्या लवकर लक्षात येते. जर किंमती नॉर्मल रेंजच्या बाहेर गेल्यावर क्राउड हे सर्व अनालिसिसकरून त्या विरुद्ध ट्रेड करायला लागते. कारण त्यांना माहित असते कि हाय आणि लो ला किंमती ह्या अस्थायी असतात. आणि काही वेळाने किंमती अवेरेज कडे वळतात. ह्या घटनेला “मार्केट रेवर्जन” असे म्हटले जाते.

किंमती सामान्यतः अवेरेज जवळच फिरत राहतात. त्या मार्केट चे संतुलन आणि त्या दिवशीची किंमतीचे सामान्य निष्कर्ष दाखवते. किंमती ज्या अवेरेज पासून दूर आहेत त्या नॉर्मली एका युनिटने खाली वर होत राहतात. आणि त्या युनिट ला “स्टैण्डर्ड डेविएशन” च्या नावाने ओळखले जाते. हे बोल्लींजर ब्यांड च्या चार्ट सेटिंग्समध्ये २ युनिट च्या डिफ़ॉल्ट वैल्यू ने दर्शविले जाते. जे किंमतीची एक्सट्रीम कंडीशन दाखवते. प्रोफेशनल ट्रेडर्स अनुभवाने जाणतात कि मार्केटमध्ये नार्मल काय असते. आणि ते मार्केटच्या एक्सट्रीम पॉइंट्स वर मार्केट च्या विरुद्ध ट्रेड करून फायदा कमवितात.

 

*क्राउड एक्सट्रीम : क्राउडचा व्यव्हार खालील चार पॉइंट्सने ओळखले जातात आणि ते म्हणजे “अकुमुलेशन”

“डीस्ट्रीबुशन” “पोजिशन चेंज” आणि “ब्रेकआउट मूवमेंट्स”.

 • अकुमुलेशन म्हणजे पहिल्या वेळेस खरीदी करणे अथवा खरीदी करून संचय करीत राहणे.

 • “डीस्ट्रीबुशन” “डीस्ट्रीबुशन” मध्ये स्टॉक किंवा कमोडिटीच्या भविष्यातील किंमतीबाबत साशंकता असेल तर त्यामुळे त्याची जोरदार विक्री होते.

 • “पोजिशन चेंज” “पोजिशन चेंज” मध्ये आपली बाय अथवा सेल पोजिशन हलकी करणे अथवा स्क्वायर ऑफ करून कैश पोजीशन मध्ये बसने होय.

 • “ब्रेकआउट मूवमेंट्स” “ब्रेकआउट मूवमेंट्स” मध्ये स्टॉक किंवा कमोडिटी सपोर्ट अथवा रेसिस्तंस तोडून नवीन झोन मध्ये दाखल होतो.तेव्हा त्याला “ब्रेकआउट मूव” असे म्हणतात.

 

 

जेव्हा किंमती नॉर्मल रेंज लिमिट जी इंडीकेटर्सने ठरविली आहे तो तोडून जर नवीन झोन मध्ये ट्रेड करण्यास लागते तेव्हा त्याला “एक्सट्रीम लेवल” म्हटले जाते. जेव्हा प्रत्येक जण जे आधीच वाढलेले आहे ते विकत घेण्यासाठी अट्टाहास करतो तेव्हा “ओवरबाउट” कंडीशनची निर्मिती होते. आणि डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा जे आधीच खूप पडलेले आहे ते विकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा “ ओवरसोल्ड“ कंडीशन निर्माण होते. हे मार्केटचे  एक्सट्रीम रूप आहेत आणि येथे प्रोफेशनल ट्रेडर्स स्टॉपलोस लावून मार्केटच्या विरुद्ध ट्रेड करायला सुरवात करतात.

मार्केट मध्ये प्रत्येक क्राउड हे वेगवेगळे असते. काही प्रत्येक वेळेस सपोर्ट आणि रेसिस्तंसचा आदर करून त्यांना अबाधित ठेवते. तर काहीजण त्याला प्रत्येक वेळेस तोडून स्वस्तात बाय अथवा सेल करून रिवर्सल देवून टाकतात आणि इतरांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. प्रोफेशनल ट्रेडर्स हे सर्व मार्केटचा अभ्यास करून सर्व विचार आणि आचार करून ठरवितात.

ट्रेंड च्या विरुद्ध दिशेत येणाऱ्या मूव ला “रेत्रसमेंट” म्हटले जाते. अपट्रेंडमध्ये रेत्रसमेंट म्हणजे किंमतीमध्ये घट येणे तर डाऊन ट्रेंड मध्ये रेत्रसमेंट हे नेहमी किंमातीतीत वाढ होण्याच्या स्वरुपात येते. त्यांना “पुलबैक्स“ असे म्हटले जाते.

कधी कधी हे रेत्रसमेंट हद्दी बाहेर चालले जातात आणि ट्रेंड रेवेर्सलमध्ये परावर्तित होऊन जातात. एक सामान्य रेत्रसमेंट जे मार्केटमध्ये मोठी पोजीशन स्क्वायर करण्यामुळे आली आहे आणि त्याच वेळेस सम्बंधित न्यूज़ आल्याने पूर्णपणे ट्रेंड रेवेर्सल मध्ये रुपांतरीत होऊन जातात.

हे एका डे ट्रेडर्सच्या दैनदिन आयुष्यात नेहमी घडत असते. प्रोफेशनल ट्रेडर्स हे करेक्शनस आणि पुलबैक्सवर नजर ठेवून असतात आणि रिवर्सल झाल्यावर तेथे स्टॉपलोस लावून मोठी ट्रेड टाकून मोठे प्रोफीटची कमाई करतात. हे करेक्शन अथवा पुलबैक्स केव्हा संपेल आणि प्रायमरी ट्रेंड केव्हा परत सुरु होईल याचा काही नियम नाही पण हे सर्व आपण चार्टवर इंडिकेटर्स आणि ओस्सीलेटर्सचं यह चार्ट पर पहले ही दिख जाते है और इंडीकेटर्स मदतीने विश्लेषित केरू शकतो आणि पाहू शकतो. पण हे सर्व करण्यासाठी अनुभवाची गरज पडते. ह्या सर्वांचा काही पक्का नियम नाही

पण प्रोफेशनल ट्रेडर्स हे सर्व अनुभवावरून नियमाचे काटे कोरपणे पालन करून मिळवतात. रेत्रसमेंट काही सामान्य नियम खालील प्रमाणे आहेत

 

 • रेत्रसमेंट मागचा हाय अथवा लो ला क्रॉस करू नये.
 • ३०% चा करेक्शनचा नियम
 • गण’स चा ५०% रेत्रसमेंटचा नियम
 • फिबोनाच्ची रेत्रसमेंट थ्योरी
 • आणि काही जण इलियट वेव थ्योरीचा उपयोग करेक्शन आणि रेवेर्सल मूव ची भविष्यवाणी करण्यासाठी करतात.

 

ह्या सर्व थ्योरीज आणि नियमाचा उपयोग करून आणि सोबत अभ्यास आणि अनुभवाची जोड लावून फायद्याची ट्रेडिंग करू शकतात. हे मुख्यतः चार टूल्स आहेत जे प्रोफेशनल ट्रेडर्स उपयोगात आणतात आणि त्यामार्फत प्रत्येक दिवशी मार्केटला ट्रक करून त्याचे मुवमेंट प्रेडिक्ट करून मार्केट मध्ये पैसा बनवतात.

आशा करतो कि हि सर्व माहिती आपल्याला आयडिया देईल कि कसे मार्केटला ट्रक करतात आणि कशी येणारी मूवमेंट प्रेडिक्ट करतात. येणाऱ्या पोस्टमध्ये आपण ह्या सर्व बाबीचा सखोल अभ्यास करू आणि काही प्रैक्टिकल ट्रेडिंगच उदाहरणे समजून घेवू.

The Author

Pramod Baviskar

Professional Market Trader And Owner Of Dalal Street Winners Advisory And Coaching Services. Working Since 2007 And Online Presence Since 2010. We Provide Highly Accurate And Professional 1 Entry And 1 Exit Future, Option, Commodity, Currency And Intraday Stock Tips On Whatsapp With Live Support And Follow Up.
COPYRIGHT © 2009-2018. Pramod Baviskar. Dalal street winners advisory and coaching services. FAQ | Disclaimer | Privacy Policy

This website is best viewed using Microsoft Internet Explorer 9 or higher, and/or latest version of Google Chrome and Mozila Firefox browsers.