बाजारात किमत नेहमी महत्वाची असते

किमतीच्या बाबतीत सर्व काही

बाजारात किमती ह्या गर्दीच्या देवाण घेवाणावरून ठरतात. खरीददार आणि विक्रेता यांच्यातील रस्सीखेचामुळे बाजारात किमती शोधल्या जातात आणि नंतर निश्तित होतात. किमतीमध्ये बाजाराची रूपरेषा , बाजाराची आधारभूत माहिती, बातम्या आणि लोकांचे समज आणि गैरसमज हे सर्व सम्मेलीत असतात. ह्यालाच “मार्केट डिस्काऊंट मेकानीस्म” म्हटले जाते.
 
ज्या पद्धतीने बाजारात बातम्याचा ओघ बदलतो, बाजाराच्या मुलभूत बाबी बदलतात त्या वेगाने आपणास बाजारात किमितीमध्ये बदल होताना दिसतो. बाजाराच्या मुलभूत बाबीमध्ये शेकडो गोष्टी सामील असतात. जसे कि मार्केट व शेअर्सचे तथ्य, बाजाराचे विचार, अत्यंत टोकाचे निर्णय, बाजाराच्या बातम्या आणि लोकांचे समज आणि गैरसमज. ह्या सर्व गोष्टी बाजारात कायम पुरवठा आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण करत राहतात, त्त्यामुळेच आपण बाजारात प्रत्येक सेकंदाला किमतींमध्ये बदल अनुभव करत असतो.
डोव थेअरी आणि किमंतीचा संबंध

चार्लस डॉव याने “ द वाल स्ट्रीट जर्नल” ह्या वृत्तपत्राची स्थपना केलेली आहे. ज्याच्यानुसार बाजारात एकच गोष्ट भरवसा करण्यालायक आहे आणि ती म्हणजे “किमत”. त्यांच्या मते बाजारात अफवा, तथ्य आणि बाजाराचा गोंधळ असताना सुध्दा किमती ह्या त्यांचे मार्गक्रमण करणे सोडत नाहीत. माझ्यामते सुद्धा बाजारात जी एक गोष्ट समोर दिसते आणि जिच्यावर ट्रेडर विश्वास ठेवू शकतो ती म्हणजे “किंमत” होय.
चार्लस डॉव याने बाजाराचे जवळून निरीक्षण केले आणि त्यांना अधोरेखित केले त्याला आज “डॉव थेअरी” ह्या नावाने संबोधले जाते.
 

डॉव थेअरीची ठळक वैशिष्ट्ये

१. किमती ह्या सारख्या ट्रेंड मध्ये मार्गक्रमण करतात.
२. एक ट्रेडर ट्रेंड चार्टवर पाहू शकतो आणि सहज ओळखू शकतो. ट्रेंड हे नियमित रूपाने तयार होतात आणि पुनरावृत्तीत होतात.
३. प्रायमरी ट्रेंड हे मुख्य असतात, तर सेकंडरी ट्रेंड ला दुय्यम ट्रेंड वा “रीत्रेसमेंट” म्हणतात. जे ट्रेड करण्यासाठी वापरले जातात.
४. प्रायमरी ट्रेंड हे त्यांच्या दिशेत सहसा बदल करत नाहीत जो पर्यंत बाजारात काही मुख्य वा मुलभूत बदल घडून येत नाही.

अधिक माहितीसाठी वाचा : ट्रेंड हाच ट्रेडर्स चा खरा मित्र

 

किंमत आणि मूल्य

किंमत आणि मूल्य ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टेक्निकल अनालिसिस च्या मदतीने ट्रेडर योग्य किंमत शोधू शकतो तर फंडामेंटल अनालिसिस च्या मदतीने योग्य मूल्य निर्धारित केले जाऊ शकते. जे शेअर्स आपल्या मूल्यापेक्षा जास्त किंमतीवर ट्रेड होतात त्यांना “ओवर व्यालूड शेअर्स” म्हणतात. हे त्या कंपनी च्या उज्ज्वल आणि संपन्न भविष्यच्या अपेक्षेमुळे, बाजारातील अफवा आणि ट्रेडर्स च्या भावनांमुळे घडते.

अधिक माहितीसाठी वाचा : टेक्निकल अनालिसिस चा जादुई डब्बा

जर शेअर्स ची किंमत त्याच्या मूल्यापेक्षा जास्त किंमतीवर ट्रेड करत असेल, तर मूल्य आणि वर्तमान किंमत यातील फरकाला “ प्रीमिअम” म्हटले जाते. त्याच प्रकारे जर शेअर मूल्यापेक्षा कमी किंमतीवर ट्रेड करत असेल तर त्या फरकाला “डिस्काऊंट” म्हटले जाते.
हे प्रीमिअम आणि डिस्काऊंट एका निवेशकाच्या कामाचे असतात. तर एक चांगला ट्रेडर चांगले फंडामेंटल असलेल्या शेअर्स मध्येच टेक्निकल अनालिसिस ची मदत घेवून ट्रेडिंग करतो. तो योग्य संधीची वाट पाहतो आणि त्या संधीला योग्य जोखीम घेवून फायद्यात रुपांतरीत करतो. ह्या प्रकारे एका यशस्वी ट्रेडर ची दैनंदिनी असते.
चला ह्याला एका चांगल्या उदाहरणाद्वारे समझुन घेवूया. मंदीमध्ये बाजारात सर्व काही पडत असते पण ब्लू चीप शेअरचे भाव हे स्माल आणि मिडकॅप शेअर्सच्या मानाने कमी पडतात, त्याचे कारण म्हणजे त्याचे फंडामेंटल. मुख्य इंडेक्स शेअर्स जसे कि निफ्टी आणि बँक निफ्टीचे मुख्य शेअर्स मध्ये ट्रेडिंग करणे हे इतर शेअर्सच्या पेक्षा कमी जोखमीचे असते. कारण ते भारतातील मुख्य कंपन्या असून त्याचे फंडामेंटल, कंपनी व्यवस्थापन , गुणवत्ता इत्यादी इतर सर्व कंपन्यापेक्षा उच्च प्रतीचे असते. ह्याच आधारावर मुख्य कंपन्या इंडेक्स मध्ये सामील वा बाहेर होतात.
टेक्निकल अनालिसिस सोबत फंडामेंटल अनालिसिस हे एका उत्प्रेराकाप्रमाणे काम करते. ज्यामुळे ट्रेडर्स ची जोखीम कमी राहूनहि त्याला जास्त फायदा मिळण्याची संधी मिळते. त्याचमुळे व्यावसाईक ट्रेडर्स नेहमी चांगल्या फंडामेंटल असलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्येच ट्रेडिंग करतात. टेक्निकल अनालिसिस ट्रेडर्स ला खारीदीची वा विक्रीची योग्य वेळ आणि किंमत सुचवते.

 

किंमती आणि टेक्निकल अनालिसिसचा उपयोग


टेक्निकल आनालीसीस चा उपयोग ट्रेडिंग कम्युनिटी साठी काही नवीन नाही, ह्याची सुरवात सन १८०० मध्ये जपानमध्ये तांदळाचे व्यापारी भविष्यातील किंमतीचा अंदाज बांधण्यासाठी करत.

अधिक माहितीसाठी वाचा : जागतिक शेअर बाजारांचा इतिहास

टेक्निकल अनालिसिस हे ट्रेडिंग समाजातील बुद्धीजीवी लोकांनी शोधले आणि आजही विकसित करता आहेत. कारण टेक्निकल अनालिसिस सामान्य शब्दात हे किमतीच्या भविष्याचे जटील गणित होय. जे कि सामान्य मानवीच्या आवाक्याबाहेरचे आहे.

टेक्निकल अनालिसिस हे कॉम्पुटर, ट्रेडिंग सिस्टीम आणि चार्तींग सोफ्टवेअर ह्या सर्वांच्या शोधा पूर्वीपासून उपयोगात आहे आणि नियमित वापरले जायचे. तेक्निकॅल अनालिसिस हे मागच्या २०० वर्षापासून वापरले जाते आहे आणि पुढे हि अजून २०० वर्ष वापरले जाईल व विकसित केले जाईल.
दर वर्षी नवीन ट्रेडिंग सिस्टीम, इंडीकेटर्स आणि चार्ट चे नवनवीन प्रकार शोधले जात आहेत आणि विकसित करून उपयोगात आणले जात आहेत.

फायदा कमवण्यासाठी ट्रेंडला बनवा आपला मित्र

ट्रेडिंग मध्ये ट्रेंड सर्वात महत्वाचा

जर आपण कोणत्याही चार्ट चे निरीक्षण कराल तर आपल्याला किमती डोंगर आणि दऱ्या यांच्या आकृतिबंध निर्माण करताना दिसतील. हि रचना “लाईन चार्ट” वर अगदी स्पष्ट दिसते. हि रचना किमती सारख्या वर आणि खाली होत असल्यामुळे तयार होतात. किंमती सामान्यतः ट्रेंडमध्ये राहतात आणि कधी कधी हे ट्रेंड सामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ टिकतात आणि क्रमीत होतात.

फायदा कमवण्यासाठी ट्रेंडला बनवा आपला मित्र

ट्रेंड म्हणजे काय ते समजून घ्या ?

ट्रेंड हे त्यांच्या दिशा आणि बाजू नुसार तीन प्रकारचे असतात. “अप ट्रेंड” मध्ये किमती ह्या वाढतात कारण बाजारात मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो. त्यानंतर “डाऊन ट्रेंड” मध्ये किंमती मध्ये घट व्हयला लागते वा किंमती पडतात कारण बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो. कधी कधी पुरवठा नसून सुद्धा किंमती पडायला लागतात कारण बाजारात मागणी नाहीच्या बरोबर असते म्हणून.

 

अधिक माहितीसाठी वाचा : जागतिक शेअर बाजारांचा इतिहास

 

ट्रेंड चा तिसरा प्रकार म्हणजे “साईड ट्रेंड”, ज्या मध्ये किंमती एका सीमेच्या आत अडकून तिथेच फिरत राहतात. हा ट्रेंड मार्केट मध्ये निर्माण झालेल्या दुविधेमुळे निर्माण होतो. हे सर्व प्रकारचे ट्रेंड आपण चार्टचे विविध वेळ लावून तपासू शकतात.

मासिक वा साप्ताहिक चार्ट चे ट्रेंड हे मुख्य ट्रेंड असतात आणि ते एका निवेशाकाच्या आणि तितकेच एका ट्रेडरच्या कामाचे असतात. दैनिक आणि इंट्रा डे ट्रेंड हे दुय्यम स्वरूपाचे असतात आणि फक्त ट्रेडर च्या कामाचे असतात.

ट्रेंड चा उपयोग करणे

ट्रेंड चा उपयोग करणे

ट्रेडिंगचा पहिला नियम आहे कि ट्रेंड ओळखायचा आणि त्याच्या दिशेने ट्रेड टाकायचे. हीच साधी आणि सरळ पद्धती फायदेशीर असते. ह्यामुळेच ट्रेंड ला ट्रेडर चा मित्र म्हणून संबोधले जाते. जे ट्रेडर ट्रेंड फॉलो करतात ते इतरांपेक्षा अधिक फायदा कमवितात आणि यशस्वी होतात. नवीन ट्रेडर वा नव सिखे ट्रेडर हाच नियम पाळत नाही आणि ट्रेंड च्या विरुद्ध दिशेने ट्रेड करून सारखा तोटा करत राहतात. आणखी नवीन ट्रेडरनां साईड ट्रेंड पण अडकवून ठेवतो व नुकसान करत राहतो.

 

जाणून घ्या : शेअर बाजारातील विविध चार्ट आणि त्यांचे प्रकार

 

नवीन ट्रेडर्स नी त्यांचा दृष्टीकोन हा कमी नुकसान आणि अधिक फायदा होईल ह्या प्रकारचा ठेवायला हवा. कारण सुरवातीच्या काळात नवीन ट्रेडर कडून अनेक चुका होत असतात आणि मार्केट मध्ये चुका म्हणजे नुकसान असते. नवीन ट्रेडर्स नि कमी जोखीम आणि ज्यास्त फायदा असणाऱ्या ट्रेडच टाकायला हव्या. अनेक ट्रेडर चुकीच्या ट्रेडस ना निवेश म्हणून ठेवतात आणि ती एक घोड चूक होती हे त्यांच्या नंतर लक्षात येते. हि चूक प्रत्येक ट्रेडर एकदा तरी त्याच्या ट्रेडिंग जीवनात करतोच करतो. ट्रेडिंग हि जोखीम आणि लाभ ह्याशी संबधित असते न कि मुल्याकानाशी.

टेक्निकल ट्रेडिंग मध्ये एका ट्रेडर ला ज्यास्त लाभ आणि कमी जोखीम अशी उपाय योजना शोधावी लागते आणि ती अमलात आणून त्या पद्धतीने ट्रेडिंग करून मार्केट ला हरवायचे असते. बाजारात प्रत्येक ट्रेडर हा वेगळा असतो , त्याचे प्राधान्य वेगवेगळे असतात आणि त्याच्या लाभ आणि जोखमीचा अनुपात हि विभिन्न असतो.

यशस्वी ट्रेडर

यशस्वी ट्रेडर

एका शिस्तबद्ध ट्रेडर चा मूलमंत्र म्हणजे ट्रेंड फॉलो करणे आणि जोखीम कधीच नाही विसरणे. ह्याचमुळे व्यावसायिक ट्रेडर अधिकतर वेळेस नफ्यात राहतात. आणि बाकीचे नुकसान भोगत रहातात. शिस्तीशिवाय ट्रेडर म्हणजे ब्रेक विना गाडी जिचा अक्सीडेंट ठरलेलाच असतो. तुम्ही नियम न पाळता एक किंवा दोन वेळेस नशीबवान ठरू शकाल, पण त्यानंतर नुकसान हे ठेवलेलेच असते.

 

बाजारात नफा मिळवण्यासाठी उघडा : टेक्निकल अनालिसिस चा जादुई डब्बा

 

व्यावसायिक ट्रेडर नि निर्माण केलेली म्हण आहे “ फायदा वाढू द्या आणि नुक्सानातून निघून जा”. हि समझ आणि अनुभव फक्त आणि फक्त शिस्तप्रिय ट्रेडिंग मधूनच मिळू शकतो. आणि हेच कारण व्यावसाईक ट्रेडर आणि सामान्य ट्रेडर मध्ये अंतर निर्माण करत चालते.

एक यशस्वी ट्रेडर साठी टायमिंग हेच सर्व काही असते. यशस्वी ट्रेडर स्वस्त विकत घेतात आणि महागात विकून फायदा कमवितात. ते सर्व अप ट्रेंड असताना खरीदी करतात आणि डाऊन ट्रेंड सुरु झाला कि नफा वसूल करत चालतात.

टेक्निकल अनालिसिसचा जादुई डब्बा

टेक्निकल अनालिसिस चा प्रारंभिक परिचय

शेअर बाजारात टेक्निकल अनालिसिसचा उपयोग किमती ओळखण्यासाठी व त्याची भविष्यवाणी करण्यासाठी करतात. ह्यामुळे ट्रेडर्स व निवेशक ह्यांना किमतीवरून खरेदी व विक्री चे निर्णय करण्याची मदत होते. टेक्निकल अनालिसिस मध्ये फक्त चार्ट वाचणे , इंडिकेटर्सचे विश्लेषण करणे , चार्ट पैटर्न्स चे परिक्षण करने इतकेच नसून ट्रेडिंग वा निवेश करताना जोखिम संभाळने व या सर्व टूल च्या आधारे फायदा कसा कमवावा हे सुद्धा शिकवले जाते.

टेक्निकल अनालिसिस चा प्रारंभिक परिचय

जर आपल्याला मार्केट मधून फायदा कमवयाचा असेल तर आपल्याला टेक्नीकल एनालिसिस पद्धतिचा उपयोग योजना आखून व योग्य जोखिम स्वीकारुन करावा लागतो. ह्याच पद्धितिने आपण एक यशस्वी ट्रेडर बनू शकाल. मार्केट मध्ये शेवटी आपण किती फायदा कमवता हेच महत्वाचे असते न की किती हुशार व किती तज्ञं आहात. मार्केट मध्ये अपनास अशी खुप व्यक्तिमत्वे भेटतील जी खुप तज्ञं आहेत पण त्याना कधीच फायद्याची ओळख झालेली नसते. आपल्याला किती चांगल्या प्रकारे चार्ट वाचता येतो, इंडीकेटर्स वापरता येतात हे महत्वाचे नसून त्या माहितीच्या आधारे आपण किती फायदा कमावता हे महत्वाचे असते. ट्रेडिंग हा व्यापार मुख्यतः फायदा आणि तोटा सम्बंधित आहे, आणि त्यासाठी टेक्नीकल एनालिसिस खुप चांगल्या प्रकारे मदत करते. टेक्निकल एनालिसिस आणि फायदा कमवाने ह्या दोन गोष्टी वेग वेगळ्या आहेत पण एक दूसरयाशिवाय शक्य नाहीत.

 

अधिक माहितीसाठी वाचा : शेअर बाजारांचा इतिहास

 

टेक्नीकल ट्रेडर

टेक्निकल ट्रेडर्स बाजारात किंमतीना पाहतो, त्याचे मापन करतो आणि त्याची भविष्यातील दिशा ठरवतो. किंमती ची दशा आणि दिशा ही बाजाराच्या जनतेच्या मनोदाशेचा परिणाम असतो. हेच शोधण्याचे साधन म्हणजे टेक्नीकल एनालिसिस होय.

टेक्नीकल ट्रेडर

व्यावारिक व फायदेशीर ट्रेडिंग मध्ये समयसूचकता असने खुप महत्वाचे असते, त्यामुळेच टी इतकी कठिन असते आणि बोटावर मोजण्या इतक्याच लोंकाना अवगत होते. छोट्या अवधिच्या ट्रेडिंग मध्ये आपण कीती उत्तम प्रकारे ट्रेडमध्ये प्रवेशित होता आणि किती लवकर आणि योग्य पद्धतीने बाहेर पड़ता ह्यावर किती फायदा होणार हे निर्भर असते. ट्रेडिंग हा समयसूचकता, योग्य विश्लेषण आणि अनुभव यावर मुख्यतः आधारित व्यवसाय आहे. जर आपण ह्या तिन्ही कला अवगत केल्या तर आपणास यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

 

अधिक माहितीसाठी वाचा : शेअर बाजारातील चार्ट आणि त्यांचे प्रकार

 

टेक्नीकल एनालिसिस आणि ज्ञान

आजच्या काळात टेक्नीकल एनालिसिस एका ट्रेडरच्या दैनदिन जीवनाचा अनिवार्य भाग झाला आहे. हा ट्रेडर्स च्या ट्रेडिंग संबंधी निर्णयात कोणत्या ना कोणत्या प्रकारे शामिल असतो आणि बाजारात फायदा कमवायचा संभाव्यता वाढवतो. कारण बाजारात विविध व्यापारी एकाच वेळेस किंमतीचे अनुमान बांधत असतात आणि सामान्यतः मुलभुत निर्देशकाचा उपयोग करत असतात ज्यामुळे किंमतीना दिशा आणि गति मिळण्यास मदत होते.जर शेअर बाजारात आपल्याला एक सफल व्यापारी बनायचे असेल तर ट्रेडिंग करताना स्वतंत्र विचार, कृतीची जबाबदारी आणि ज्ञानचा अवलंबन ना कि मनाचे. एक यशस्वी ट्रेडर नेहमी नुकसानातून लवकर बाहेर पडतो , फायदा लक्ष्य पर्यंत पकडून ठेवतो. याउलट नवीन ट्रेडर विरुद्ध वागून नुकसान वाढवत राहतात आणि जीवनात अशा ठिकाणी येवून थांबतात जेथे त्यांना कधीच यायचे नव्हते.

 

टेक्नीकल एनालिसिस आणि बुद्धिमत्ता

 

योग्य टेक्निकल अनालिसिस पद्धती मार्केटला हरवायला मदत करतात ज्याकी एका ट्रेडर साठी आनंददायी आणि बक्षीसासमान असतात. ह्यामुळे एका ट्रेडरचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला विजेता बनण्यासाठी प्रोत्सान देत राहतो. मार्केट आपण कोण आहात, काय करता वा कोठून आलेला आहात हे बघत नाही तर फक्त हे बघतो कि किती चांगले ट्रेडर आहात. मार्केट मध्ये प्रत्येक चुकीची लगेच किंमत चुकवावी लागते तर योग्य ट्रेड चा इनाम सुद्धा लगेच भेटतो. जर आपणास हार मानलेल्या व्यापारांच्या पंक्तीत बसायचे नसेल तर आज पासून टेक्निकल अनालिसिस पद्धतीचा आणि जोखीम व्यवस्थापनाचा अवलंब करा आणि आपल्या ट्रेडिंग जीवनाला सुखी आणि समाधानी बनवा.

शेअर बाजारांचा इतिहास

154186232

स्टॉक मार्केट ची व्याख्या

स्टॉक मार्केट वा इक्विटी मार्केट अथवा शेयर बाजार हि एक संस्थेप्रमाणे काम करते जेथे खरीददार आणि विक्रेता कंपनीच्या शेअर अथवा समभागांची आणि इतर आर्थिक साधनांची घेवाण-देवाण करतात. भूतकाळात शेअर्स हे भौतिक सर्टिफिकेटच्या स्वरुपात खरीदी-विक्री होत पण आता डीजीटल युगात हे सर्व काम शेअर बाजारात आभासी स्वरुपात आभासी मंचावर होते. आज पण वास्तविक स्वरुपात शेअर्स ची देवाण-घेवाण होते परंतु ते आता फक्त मोठ्या आर्थिक संस्था , निवेश बँका आणि मोठे व्यापारीच करतात.

२०१२ संपता संपता जागतिक शेअर बाजाराचे एकूण भांडवल हे जवळपास ५५ लाख अब्ज डॉलर ऐवडे होते. त्यामध्ये अमिरीकन शेअर बाजाराचा ३४% हिस्सा होता तर जपान आणि इंग्लंडच्या बाजाराचा ६% सहभाग होता. जगामध्ये जवळपास ६० शेअर बाजार आहेत आणि त्याचे भांडवल एकत्र केले तर ते जवळपास ६९ लाख अब्ज डॉलर इतके भरेल. त्यातल्या १६ शेअर बाजारांचे भांडवल हे १ लाख अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे आणि ते जवळपास विश्व बाजाराचा ८७% हिस्सा व्यापतात. हे मुख्य शेअर बाजार ३ खंडानुसार विभागले गेले असून, आणि ते आहेत आशियायी, युरोपिअन आणि अमिरीकन शेअर बाजार.

Stock exchange in India

भारतीय शेअर बाजार

भारतात मुख्यतः २ शेअर विनिमय संस्था आहेत. त्या म्हणजे NSE ( नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ) आणि BSE ( बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ). ह्याच दोन एक्सचेंजवर सर्वाधिक ट्रेडिंग होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे १८७५ मध्ये कार्यान्वित झाले तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज हे १९९२ मध्ये स्थापन झाले व १९९४ ला त्यामध्ये ट्रेडिंगला सुरुवात झाली.

bse आणि nse दोन्ही वेग-वेगळे एक्सचेंजेस आहेत पण त्याची कार्यपद्धती, कार्य वेळ, सेटलमेंट पद्धत इत्यादी सर्व जवळपास सारखे आहेत. BSE अंदाजे ४७०० कंपन्या लिस्टेड आहेत तर हा आकडा NSE साठी १२०० च्या वर आहे. BSE च्या मुख्य ५०० कंपन्या बाजाराचा ९०% भांडवल भाग गृहीत करतात बाकी १०% शेअर्स हे कमी संख्येने ट्रेड होतात.

How stock exchange works

शेअर बाजारची कार्यप्रणाली

शेअर बाजारात कंपन्या आप-आपले समभाग वा शेअर्स विकून भांडवल उभे करतात. या भांडवलचा उपयोग ते व्यवसाय वाढवण्यासाठी अथवा कर्ज कमी करण्यासाठी करतात. अधिकतम कंपन्या भांडवल उभारण्याचा हाच रस्ता निवडतात आणि प्राथमिक सार्वजानिक प्रस्तावाद्वारे ( IPO ) ते त्यांचे शेअर्स मार्केट मध्ये सामन्य नागरिकांना विकून पैसा गोळा करतात. कारण कर्ज घेवून त्यावर अधिक व्याज भरण्यापेक्षा कंपन्या कंपनीतील काही हिस्सा विकून पैसा गोळा करून त्याचा आधीचे कर्ज कामीकरण्यासाठी अथवा व्यवसाय विस्तारासाठी उपयोग करतात. हा रस्ता त्यांचासाठी साधा आणि सरळ असतो. कधी कधी कंपन्या अधिकचे कर्ज कमी करण्यासाठी FPO ( पुढील सार्वजनिक प्रस्ताव ) बाजारात आणतात. जे लोग कंपन्याचे शेअर्स खरीदी करतात ते त्या कंपनीचे त्या प्रमाणात भागीदार बनतात. जर कंपनीला नफा झाला तर कंपनी त्यांना तो नफा लाभांश स्वरुपात वाटते. कंपनीचा नफा वाढत राहिला वा कंपनी चा चांगल्या प्रकारे व्यवसाय करत असेल तर कंपनीच्या शेअर्स ची मागणी वाढून त्यांचा भाव वधारतो.

IPO द्वारा कंपनी शेअर बाजारात लिस्ट वा सामील होते आणि त्यानंतर तिच्या शेअर्स मध्ये ट्रेडिंगला सुरुवात होते. बाजार वेळेत एखादी व्यक्ती कितीही वेळेस ह्या शेअर्स मध्ये खरीदी अथवा विक्री करू शकते. बाजारात ट्रेडिंग घडून येण्यासाठी खरीददार आणि विक्रेता ह्या दोघांची गरज असते त्याशिवाय सौदा घडून येवूच शकत नाही. दोघांमध्ये ज्या भावात ट्रेडिंग घडून येते त्याला “ सौदा ” असे म्हणतात. मार्केट मध्ये सौदे हे लगातार वेगवेगळ्या भावाला पडत असतात त्यचे कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील असमतोल, बाजाराला प्रभावित करणाऱ्या बातम्या, बाजाराची दिशा आणि दशा. त्यामुळेच शेअर्स भाव हे कधी वर तर कधी खाली दिसून येतात.

या सर्व गोष्टीमुळे बाजार दिवसेंदिवस अधिक जटील आणि अस्थिर होत आहेत पण टेक्नोलॉजीमुळे ट्रेडिंग हि अधिक सुलभ आणि स्वस्त होत आहे. सरळ शब्दात स्टॉक मार्केट मध्ये शेअर्सची खरीदी आणि विक्री होते.

History of stock exchange in India

भारतीय शेअर बाजाराचा इतिहास

भारतात पहिला संघटीत शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो कि आशियातील सर्वात जुना बाजार आहे. १८९४ मध्ये कापड मिलच्या शेअर ट्रेडिंग साठी अहमदाबाद शेअर एक्सचेंज ची सुरुवात करण्यात आली. १९०८मध्ये कलकत्ता स्टॉक एक्सचेंज ची स्थापना जूट अंड संबधित गोष्टीच्या कंपनीच्या शेअर ट्रेडिंग साठी सुरुवात करण्यात आली. मद्रास स्टॉक एक्सचेंज ची स्थापना १९२० मध्ये झाली. भारतात जवळपास २४ स्टॉक एक्सचेंज होते आणि त्यापैकी २१ स्टॉक एक्सचेंजची स्थापना प्रादेशिक उद्योग धंद्यांना चालना मिळावी यासाठी करण्यात आली. सुधारणा प्रणालीतून २ मुख्य एक्सचेंज अस्तितवात आले ते म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि ओवर द काउंटर एक्सचेंज ऑफ़ इंडिया (OICEI) ज्याचे काम आणि प्रसार हा राष्ट्रव्यापी आहे.

स्टॉक एक्सचेंज हे गवर्निंग बोर्ड व कार्यकारी मुख्य अधिकारी चालवतात व नियंत्रित करतात. वित्त मंत्रालय ह्या दोघांना अधिनियमित आणि नियंत्रित करते. सेबी ची स्थापना १९८८मध्ये सरकारतर्फे करण्यात आली जी कि एक मार्केट रेगुलेटर व आर्थिक व्यापार संबंधी उद्योग व संस्था नियंत्रित व अधिनियमित करण्याचे काम करते.

Stock market history

शेअर बाजारांचा वैश्विक इतिहास

१२व्या शतकात राजाचे मंत्री व अधिकारी हे शेतकऱ्यांना कर्ज वाटप आणि त्यांचे नियमन करीत असत. ह्या व्यक्ती हे करत असताना ह्या कामच्या बदल्यात फी आकारात आणि त्यामुळेच यांना जगातील “प्रथम दलाल” संबोधले जाते.

एक आख्यायिका अशी पण आहे कि बेल्जियम देशाच्या ब्रुज शहरात कमोडिटी ट्रेडर्स वैन डे बुर्जे ह्याच्या घरी मिटिंग करण्यासाठी जमा होत आणि त्यातूनच १४०९मध्ये “ बुर्जे बौर्से ” ह्या जागेची स्थापना झाली. ह्याच प्रकारची मीटिंग हीच व्यक्ती बेल्जियम च्या अन्तवेर्प शहरात घडवून आणत जे कि त्यावेळचे सर्वाधिक व्यापारी व व्यापार असलेले शहर होते. त्यातूनच हि जागा कमोडीटी ट्रेडिंग करण्याची जागा बनून राहिली. हि बातमी आजूबाजूच्या शहरात व राज्यात पसरून त्याठिकाणी सुद्धा अशी केंद्रे सुरु झाली ज्यांना “बेउर्जें” म्हणत.

१३व्या शतकात वैटिकन बँक अधिकारी सरकारी सिक्योरिटीज मध्ये ट्रेडिंग करायचे. १३५१ मध्ये सरकारने काही जणांवर बंदी लादली कारण ते अफवा पसरवून सरकारी फंड्स ची किमत कमी करण्याचे षड्यंत्र करत होते. हे बघून १४व्या शतकात इतर शहरे जसे कि पिसा , जेनोआ, वेरोना व फ्लोरेंस यांनी सुद्धा सरकारी सिक्योरिटीज मध्ये ट्रेडिंग ची सुरुवात केली. हे यामुळे शक्य झाले कारण ह्या शहरांवर व राज्यांवर राजाचा हुकुम नव्हता तर ती जनपरिषद मार्फत चालवली जायची. मार्केट मध्ये शेअर्स उतरवणारी पहेली कंपनी हि इटालीयन होती. हीच परम्परा इंग्लंड व आजूबाजूच्या देशात १६व्या शतकापर्यंत पोहचली.

१६०२ मध्ये डच इस्ट इंडिया कंपनी जी कि एक जॉइंट स्टॉक कंपनी होती व जिने फिक्स कैपिटल शेयर मार्केट मध्ये उतरवले होते, त्यामुळेच ह्या कंपनीचे शेअर्स विविध एक्सचेंजावर एकाच वेळेस ट्रेड होवू शकत होते. ह्याचमुळे एम्स्टर्डम एक्सचेंज वर ऑप्शन आणि इतर डेरीवेटीव ट्रेडिंग ची सुरुवात झाली. डच ट्रेडर्सनी “शोर्ट सेलिंग” ची संकल्पना अस्तीत्वात आणली. आज जगातील प्रत्येक विकसित व विकानसील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. जगामध्ये अमेरिका,इंग्लंड, जपान, भारत ,चीन,कॅनडा व जर्मनी चे शेअर बाजार सर्वात मोठे बाजार म्हणून ओळखले जातात.

History of the American stock market

अमिरीकेच्या शेअर बाजाराचा इतिहास

अमेरिकन स्टॉक एक्सचेंज ( AMEX ) ची सुरुवात सन १८०० मध्ये झाली. १९२१ पर्यंत ह्या एक्सचेंज ला “कर्ब एक्सचेंज” म्हणून सुद्धा ओळखले जायचे. ह्या एक्सचेंज आधिकारिक स्थापना १९२१ मध्ये झाली जेव्हा यांचे स्थानातरण ट्रिनिटी चर्च जवळील इमारतीत झाले. पण याची घोषणा १९५३ पर्यंत झाली नव्हती. नोव्हेंबर १९९८ ला ह्या एक्सचेंजचे विलानीकरण होवून “नैस्डेक-एमेक्स एक्सचेंज” ची स्थापना झाली.

ऑक्टोबर २००८ मध्ये अमेरिकन स्टॉक एक्सचेंज चे अधिग्रहण NYSE euronext ने केले. तेव्हापासून हळूहळू सर्व माहिती व कामे NYSE एक्सचेंजवर हलवून AMEX बंद करण्यात आले. जानेवारी २००९मध्ये याचे आधिकारिक नामांकरण NYSE AMEX झालेले आहे.

चार्ट प्रकार (मराठी मध्ये)

चार्ट म्हणजे निर्धारित कालावधी नुसार किमतीची आकृतिबंध मांडणी करणे. कालावधी हा काही मिनिटापासून ते वर्षापर्यंत असू शकतो.
किमत मांडणी वा आकृतीच्या आधारावर चार्तांचे विविध प्रकार पडतात. सामान्यतः Y-अक्षावर किंमतीची माडणी केली जाते व X- अक्षावर वेळ दाखवली जाते. तांत्रिक निर्देशक सामान्यतः खालच्या बाजूला दाखवले जातात.
कालावधी नुसार चार्ट हे ५ मिनिटे , १० मिनिटे , १५ मिनिटे, अर्धा तास , तासिक , ४ तासिक , दिवसीय ,साप्ताहिक आणि मासिक या प्रकारात विभागले जातात . साधारणपणे दिवसीय आणि इंट्रा डे चार्ट हे छोट्या कालावधीमध्ये किंमतीची हालचाल अभ्यासण्यासाठी केले जातात. साप्ताहिक आणि मासिक चार्ट हे मुख्यतः निवेशक दीर्घकालीन किंमत तपासणी व अंदाजासाठी वापरले जातात.
५ अंड १० मिनिटांचे चार्ट हे स्कॅल्पेर्स च्या कमी येतात. १५ मिनिटे ते दिवसीय चार्ट हे डे आणि अल्प कालीन ट्रेडिंग साठी वापरले जातात. साप्ताहिक व मासिक चार्ट हे स्विंग ट्रेडिंग व निवेशासाठी असतात.
किंमत आखणीच्या आधारावर चार्तांचे विविध प्रकार पडतात जसे कि रेखा, बार, कॅण्डलस्टिक आणि बिंदू आकृती ( पोइंट अंड फिगर ) चार्ट. हे चार्तांचे मुख्य प्रकार आहेत, इतरहि बरेच प्रकारचे चार्ट असतात पण त्यांचा देनंदिन व्यापारात क्वचितच उपयोग होतो. त्यामध्ये रेन्को, हेईकीन-अशी,एक्वी वाल्युम , कॅण्डल वाल्युम, कागी आणि ३ रेखा छेद चार्ट इत्यादी. हे प्रकार येतात.
आकृती १ निफ्टी फ्युचर रेखा चार्ट
आकृती १ निफ्टी फ्युचर रेखा चार्ट
रेखा चार्ट हा काढण्यात आणि समजण्यात सर्वात सोपा चार्ट प्रकार आहे. या प्रकारात किंमती ह्या एका रेषेने जोडलेल्या असतात. साधारणत: शेअरचा दिवसाचा बंद भावाची किंमत येथे वापरली जाते. कधी कधी open ,high वा low ची किंमत सुद्धा वापरण्यात येते. जेव्हा भावाचे बिंदू रेषेने जोडले जातात तेव्हा ते किंमतींची दिशा अंड गती स्पष्ट करतात. लाईन चार्ट समजण्यास सोपा असतो पण त्यावरून ट्रेडिंग करणे सोपे नसते व नुकसानदायक ठरू शकते.
आकृती २ निफ्टी फ्युचर बार चार्ट
आकृती २ निफ्टी फ्युचर बार चार्ट
सुरुवातीच्या काळात बार चार्ट हे खूप प्रसिद्ध होते आणि आज हि काही जण हा चार्ट वापरतात. एक बार हा एक वेळ बिंदू दर्शवितो. बार चार्ट हा सामन्यत: एका दिवसाची किंमतीची हालचाल दाखवतो. पण याचा उपयोग इंट्रा डे चार्ट, साप्ताहिक चार्ट व मासिक चार्ट साठी हि केला जातो.
बार चार्ट मध्ये प्रत्येक बार त्या वेळेचा ओपन,हाय ,लो आणि क्लोज दाखवतो. बारचा वरचा बिंदू हाय दर्शवितो तर खालचा बिंदू हा लो असतो. डाव्या बाजूची खाच इस ओपन किंमत असते तर उजव्या बाजूची खाच हि क्लोज किंमत असते. बार चार्ट रचनाचा उपयोग हा व्यापारी आणि तांत्रिक विश्लेषक करत असतात.
आकृती ३ निफ्टी फ्युचर कॅण्डल स्टिक चार्ट
आकृती ३ निफ्टी फ्युचर कॅण्डल स्टिक चार्ट
आताच्या काळात कॅण्डलस्टिक चार्ट हा प्रकार सर्वात लोकप्रिय आहे. अनेक ट्रेडर हाच चार्ट प्रकार तत्यंच्या रोजच्या व्यापारासाठी उपयोगात आणतात. ह्या प्रकारचे चार्ट हे अनेक वेबसाईट वर फ्री मध्ये उपलब्ध असतात. हा चार्ट बार चार्ट प्रमाणेच असतो फक्त या मध्ये किंमती एका मेणबत्ती च्या आकारात दाखवलेल्या असतात. ह्या मेणबत्ती ला दोन्ही टोकला वाती असतात त्यांना “शाडो” असे संबोधले जाते. दोन्ही वाती मधील भागाला “बॉडी” असे म्हणतात. कॅण्डल चा क्लोज जर ओपन च्या वर असेल तर अशी कॅण्डल हिरवी वा पांढरी दाखवली जाते. कॅण्डल चा क्लोज हा ओपन च्या खाली असेल तर अशी कॅण्डल लाल वा काळी दाखवली जाते. हिरवी कॅण्डल म्हणजे किंमत हि वाढली आणि लाल कॅण्डल म्हणजे किंमत मध्ये घट झाली.
कॅण्डलस्टिक चार्ट रचना ह्या ट्रेडर मध्ये खूप लोकप्रिय आहे आणि यांचा सर्रास उपयोग केला जातो. छोट्या अवधीच्या ट्रेडिंग मध्ये यांचा उपयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. ट्रेंड संपताना वा सुरु होताना जे चार्ट रचना टायर होतात त्या खुप महत्वपूर्ण असतात.
आकृती ४ निफ्टी फ्युचर बिंदु आकृति चार्ट
आकृती ४ निफ्टी फ्युचर बिंदु आकृति चार्ट
बिंदु आकृति चार्टिंग ही विलक्षण व वेगळ्या प्रकारचा चार्ट प्रकार आहे. ह्यामध्ये कालावधिला महत्व नसून किंमतीना आहे. हा चार्ट रेखाटन करण्याची पद्धति सुद्धा वेगळी आहे. ह्या चार्ट प्रकारात किंमती त्यांच्या दिशेनुसार आकृतित केल्या जातात. जर किंमती मध्ये योग्य वाढ झाल्यास चार्टवर X चे चढ़ते स्तंभ काढले जातात व योग्य घट झाल्यास O चे उतरते स्तंभ काढले जातात. या चार्टमधे X व O हे किंमतीवर आधारित आहे न की कालावधिवर. या चार्ट मध्ये परावर्तन आकार ( रिवर्सल साइज़ ) हे एक मापदंड असते जे की मुलभुतपणे ३ ठेवलेले असते. जो पर्यंत किंमती ३ कालखंडामध्ये त्याची दिशा बदलत नाही तो पर्यंत X वा O हे रेखांकित केले जातात. अनुभवी व्यावसायिक हा चार्ट वापरतात कारन त्यंच्यामते हा चार्ट किंमतीची दिशा योग्यपणे निदर्शित करतो.